scorecardresearch

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी पार पडला शाही विवाहसोहळा, मेहंदीचे फोटो व्हायरल

मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. नुकताच एका मराठी अभिनेत्रीच्या घरी शाही विवाहसोहळा पार पडला.

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी पार पडला शाही विवाहसोहळा, मेहंदीचे फोटो व्हायरल
मराठी अभिनेत्रीच्या घरी शाही विवाहसोहळा पार पडला. (फोटो: ऋतुजा बागवे/ इन्स्टाग्राम)

मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाबबद्ध होत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच मराठी कलाविश्वातील लोकप्रिय हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही जोडी विवाहबंधनात अडकली. त्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्रीच्या घरी शाही विवाहसोहळा पार पडला.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या बहिणीचा लग्न समारंभ नुकताच पार पडला. बहीण अनुजाच्या लग्नात ऋतुजा कलवरी म्हणून मिरवत होती. तिची लग्नपत्रिकाही ऋतुजाने स्वत:च्या हाताने बनवली होती. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता ऋतुजाने बहिणीच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा>> हिरवा चुडा, मंगळसूत्र अन् टिकली; अक्षयाच्या “मिसेस जोशी” फोटोने वेधलं लक्ष

हेही वाचा>> समीर चौगुलेंना चाहत्याने बनवलं स्पायडरमॅन; अभिनेता पोस्टवर कमेंट करत म्हणाला…

ऋतुजाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या मेहंदी सोहळ्यातील फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोला तिने “करवलीची मेहंदी” असं कॅप्शन दिलं आहे. ऋतुजाच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>>“राखी सावंतला मॉलमध्ये बघताच माझी आई जोरात ओरडली अन्…” सोनाली कुलकर्णीने सांगितला ‘तो’ किस्सा

ऋतुजाने नाटक व मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ऋतुजा नंतर ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘तू माझा सांगाती’ या मालिकांतही दिसली होती. ‘अनन्या’ या नाटकाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 19:38 IST

संबंधित बातम्या