scorecardresearch

“लिहायला उशीर झाला असला तरी…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

तिने या कार्यक्रमाच्या खास आठवणीही सांगितल्या आहेत.

samira gujar post
समीरा गुजरची पोस्ट

मराठी सिनेसृष्टीत उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे प्रेक्षकांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून समीरा गुजरला ओळखले जाते. ती अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्तम सूत्रसंचालिकादेखील आहे. समीरा गुजरच्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे.

समीरा गुजरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘स्वरमैत्र’ या कार्यक्रमाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. याबरोबर तिने या कार्यक्रमाच्या खास आठवणीही सांगितल्या आहेत.
आणखी वाचा : “रिंकूने मला थांगपत्ताच लागू दिला नाही की ती…”, सायली संजीवने सांगितला किस्सा, म्हणाली “त्या काळात आमची मैत्री…”

surbhi
“आजवर छेड काढणाऱ्या ४ पोरांना धुतलंय…,” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “शाळेत असताना…”
Shefali
Video: शेफाली शाहने पाहिलं रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वेचं ‘चारचौघी’ नाटक, मराठीत प्रतिक्रिया देत म्हणाली, “सगळ्या कलाकारांची कामं…”
siddharth chandekar and mitali mayekar
Video : “…म्हणे मी मोठी झालीये!”, सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला बायको मितालीचा मजेशीर व्हिडीओ
tejashri pradhan (2)
“तेजश्री प्रधान खूप…” लोकप्रिय गायिकेने केला अभिनेत्रीच्या स्वभावाबद्दल खुलासा, म्हणाली…

समीरा गुजरची पोस्ट

“ही पोस्ट लिहायला उशीर झाला असला तरी स्वरमैत्रची ही दिवाळी पहाट मनात अजूनही लखलखते आहे….
धन्यवाद @mukeshpatilventures…. इतक्या सुंदर कार्यक्रमात मला सहभागी करून माझी दिवाळी अधिक तेजोमय केल्याबद्दल…..

जुळून आलेले स्वरमैत्र ही तल्लीनता मंत्रमुग्ध रसिक, विशेष उपस्थिती – अश्विनी भावे, भारती आचरेकर, दीपा जोशी, सुनयना आणि कुशल बद्रिके. विंगेतले काही धमाल क्षण पुढच्या पोस्टमध्ये शेअर करते…..”, असे समीरा गुजरने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम लाडक्या दादूसचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, अरुण कदमांचे सगळे फोटो केले डिलीट

दरम्यान समीरा गुजरने ‘गाढवाचं लग्न’ या चित्रपटाच राजकन्येची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झालं. त्याबरोबरच काही दिवसांपूर्वी ती ‘आय एम सॉरी’ या चित्रपटात झळकली. तसेच तिने ‘रानबाजार’ या वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. यात तिने चारुदत्त मोकाशीच्या बायकोची भूमिका साकारली होती. त्याबरोबर काही दिवसांपूर्वी ती ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेत काम करताना दिसली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress samira gujar share instagram post talk about swaramaitra nrp

First published on: 21-11-2023 at 12:00 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×