Premium

“विराजसने मला…” शिवानी रांगोळेने सांगितलं बरेच महिने छोट्या पडद्यापासून दूर राहिल्याचं कारण

गेल्या वर्षी तिने अभिनेता विराजस कुलकर्णी लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला होता.

shivani virajas

अभिनेत्री शिवानी रांगोळे ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. गेल्या वर्षी ३ मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तिने अभिनेता विराजस कुलकर्णी लग्नगाठ बांधली. पण मध्यंतरीच्या काळात ती छोट्या पडद्यापासून दूर होती. तर आता जवळपास वर्ष-दीड वर्षांनी ती पुन्हा एकदा आपल्याला मालिकेच्या माध्यमातून भेटायला आली आहे. ती गेले काही महिने छोट्या पडल्यापासून का दूर होती याचं कारण आता तिने सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच सुरू झालेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत शिवानी प्रमुख भूमिकेत दिसत आहे. अक्षरा असं तिच्या व्यक्तीरेखेचं नाव आहे. सध्या या मालिकेची आणि तिच्या भूमिकेची खूप चर्चा आहे. आतापर्यंत तिच्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. पण तरीही ती छोट्या पडद्यापासून काही महिने का लांब होती असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता अखेर शिवानीने याचं उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा : “फक्त मालिकेतल्या सासू व नवऱ्यालाच…” मृणाल कुलकर्णींचा सून शिवानी रांगोळेला मजेशीर सल्ला

‘मज्जा’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “गेल्या वर्षभर मी एकही मालिका घेतली नव्हती कारण माझ्या मनासारखं काम मिळत नाही तोवर ते करायचं नाही असा माझा अट्टाहास होता. मी आता आपण एखादा प्रोजेक्ट करावा असं मला नेहमी वाटायचं. पण मला निर्णय घेण्यामध्ये विराजस नेहमीच मदत करतो. तो मला नेहमी सांगतो की, तुला आत्ता असं वाटतंय पण नंतर तुझं मत बदलू शकतं. त्यामुळे तू तुझा वेळ आहे आणि योग्य निर्णय घे. यावेळीही त्याने मला हे सांगितलं. आपल्या आयुष्यात असं कोणीतरी सांगणारं हवं आणि ते काम विराजस करतोय. त्यामुळे तो एक गुणी नवरा आहे असं आपण म्हणू शकतो.”

हेही वाचा : दोन दिवसांत पिंपल घालवायचेत? सुकन्या मोनेंनी सांगितला सोपा घरगुती उपाय, म्हणाल्या…

आता तिचं हे बोलणं खूप चर्चेत आलं असून मोठ्या कालावधीनंतर ती मालिकेत दिसत असल्याने तिचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress shivani rangole revealed why she was away from television for long time rnv

First published on: 16-03-2023 at 12:39 IST
Next Story
घरातील ‘तो’ फोटो शेअर करत प्राजक्ता माळीची पोस्ट, म्हणाली “दोन कोपरे…”