लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या एका पोस्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीच्या बारशाला तिच्या आईने जी साडी नेसली होती, तीच साडी तब्बल ३१ वर्षांनी पुन्हा नेसली आणि त्यात फोटो काढले. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर ही अभिनेत्री नेमकी कोण? हे जाणून घेऊयात.
तर ही मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या नवीन पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. शिवानीने आईची ३१ वर्षे जुनी साडी नेसली. शिवानीने तिचा साडीतील फोटो पोस्ट केला. त्याचबरोबर जेव्हा तिच्या आईने ३१ वर्षांपूर्वी ही साडी नेसली होती, तेव्हाचा खास फोटोही पोस्ट केला. विशेष म्हणजे तेव्हा शिवानी अगदी काहीच दिवसांची होती. आईने साडी नेसण्याचं निमित्त काय होतं, तेही शिवानीने सांगितलं आहे.
शिवानीने हिरव्या काठांच्या पिवळ्या डिझाइन असलेल्या साडीतील तीन फोटो शेअर केले आहेत. या साडीत शिवानी खूपच सुंदर दिसतेय. विशेष म्हणजे ही साडी शिवानीच्या आईची आहे. “माझ्या बारशाला आईनी नेसलेली ही साडी काल मी नेसले!! इतकी वर्षं ती आहे तशीच टवटवीत आहे, साडी आणि आई दोन्ही!” असं कॅप्शन शिवानी रांगोळेने दिलंय.
पाहा शिवानी रांगोळेची पोस्ट
शिवानी रांगोळेच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शिवानी सोनारनेही फोटोंवर कमेंट केली आहे. ‘साडीत तू खूप सुंदर दिसत आहेस,’ ‘किती छान आठवण’, ‘मास्तरीन बाई सुंदर दिसताय,’ ‘वाह, अप्रतिम’ अशा कमेंट्स शिवानीच्या फोटोंवर पाहायला मिळतात.
