marathi actress shreya bugde is fan of maharashtrachi hasyajatra fame samir choughule | Loksatta

“मी त्याची…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारासाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट

श्रेया बुगडेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील कलाकारासाठी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

“मी त्याची…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारासाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट
हास्यजत्रेतील कलाकारासाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री श्रेया बुगडेने अल्पावधीतच कॉमेडी क्वीन अशी ओळख मिळवली. विनोदी अभिनयाने श्रेया प्रेक्षकांना खळखळून हसवते. ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून प्रसिद्धी मिळविलेली श्रेया ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील विनोदवीराची चाहती आहे.

YouTube Poster

श्रेया हास्यजत्रेतील समीर चौगुलेंची मोठी चाहती आहे. श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये समीर चौगुलेंबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटो तिने छान कॅप्शनही दिलं आहे. “मी ज्याची खूप मोठी फॅन आहे. आज तो खूप दिवसांनी भेटला”, असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून लोकप्रियता मिळविलेल्या समीर चौगुलेंचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यात आता श्रेया बुगडेही आहे. समीर चौगुलेंचे डायलॉग चाहत्यांच्या अगदी तोंडपाठ असतात. विनोदाचं अचूक टायमिंग साधत ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात.

समीर चौगुलेंनी मराठी चित्रपटातंही काम केलं आहे. तर ‘चला हवा येऊ द्या’मधून प्रेक्षकांना हसवणाऱ्या श्रेयानेही अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 12:28 IST
Next Story
तरुण मुलाची फोनवरच उर्फी जावेदला शिवीगाळ; अभिनेत्री संतापून म्हणाली “आई-वडिलांना…”