Marathi Actress New Home : गेल्या वर्षात अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या नवीन घराची स्वप्नपुर्ती केली. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे सिया पाटील. सियाने गेल्यावर्षी नवीन घर घेतलं होतं. या नवीन घराबद्दल तिनं सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती.
मराठी मालिका आणि सिनेमांमधून घराघरांत पोहोचलेल्या सिया पाटीलने गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन घर खरेदी केलं. तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे या नव्या घराची खास झलक शेअर केली होती.
अभिनेत्री सिया पाटील ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या दैनंदिन अपडेट्स शेअर करत असते. याच सोशल मीडियाद्वारे तिनं तिच्या नव्या घराची झलक शेअर केली होती. गेल्यावर्षी दिवाळीत अभिनेत्रीनं पुण्यात आलिशान असं घर खरेदी केलं होतं.
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे सियानं या घराचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. तिनं या नव्या घरात वेगळं देवघर बांधलं आहे. या देवघरात शंकराची प्रतिमा आहे. तिच्या या घराला प्रशस्त हॉल आहे. तसंच छोटीशी बाल्कनीदेखील आहे. या बाल्कनीत एक झोपाळादेखील आहे.
सियानं व्हाईट आणि ब्राऊन या दोन रंगांनी तिचं हे घर सजवलं आहे. त्याचबरोबर या रंगांना साजेसं असं इंटीरिअरसुद्धा तिनं या नवीन घरात केलं आहे. तसंच सियानं तिच्या पुण्याच्या या नव्या घरात ठिकठिकाणी शोभेच्या वस्तूदेखील ठेवल्या आहेत. या वस्तूंमुळे नव्या घराची शोभा आणखीनच वाढली आहे. एकूणच सियाने घेतलेलं हे नवीन घर खूपच छान आणि प्रशस्त असं आहे. सियानं स्वत:च या नव्या घराची पूजा केली होती. या पूजेचे फोटोही तिनं सोशल मीडियाद्वारे शेअर केले होते.
सिया पाटीलच्या पुण्यातील नव्या घराचा व्हिडीओ
दरम्यान, सियाबद्दल सांगायचं झाल्यास, ती मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं ‘झक मारली बायको केली’, ‘चल गंमत करू’, ‘नवरा माझ्या बायकोचा’, ‘भागम भाग’, ‘बाप रे बाप’, ‘मोहन आवटे’, ‘धूम टू धमाल’, ‘गर्भ’, यांसह अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
मराठी मालिका आणि सिनेमांसह तिने हिंदी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीत काम केलं आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरसुद्धा तितकीच सक्रिय असते.

