आज मराठी भाषा जगभरात पोहचली आहे. महाराष्ट्राची भाषा म्हणून मराठीची जरी ओळख असली तरी याच प्रदेशात काही बोली भाषादेखील आहेत. खान्देशात खान्देशी भाषा, विदर्भात वऱ्हाडी भाषा तर कोकणामध्ये मालवणी भाषा, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये ही भाषा बोलली जाते. आता याच भाषेत बोलण्याचा प्रयत्न ‘अप्सरा’ फेम अर्थात सोनाली कुलकर्णी केला आहे.
सोनाली कुलकर्णीने नुकतीच ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला हजेरी लावली होती. तर याच पुरस्कार सोहळ्यात अंकिता वालावलकर या लोकप्रिय कंटेंट क्रिएटरशी मजेशीर संवाद साधला. यावेळी अंकिताने सोनालीबरोबर धमाल केली. अंकिता सोनालीला असं म्हणाली की आम्हाला असं कळलं आहे की तू आता मालवणी चित्रपटात काम करत आहेस? त्यावर सोनाली म्हणाली हे अर्ध खरं आहे. मला आवडेल काम करायला तू मला एक शिकावं. तिच्या उभा उत्तरावर अंकिताने तिला खास मालवणी शैलीत एक वाक्य म्हणायला लावले. सोनालीनेदेखील पूर्णपणे मालवणी बोलण्याचा प्रयत्न केला.
Video: “कोकणी माणसाचा आवाज दाबू नका…” सुव्रत जोशीचा व्हिडीओ चर्चेत
आता त्यांचा हा गंमतीशीर व्हिडीओ खूप चर्चेत आला असून यावर चाहते कमेंट करत आहेत. एकाने लिहले आहे मस्तच तर दुसऱ्याने हसण्याच्या स्माईली कमेंटमध्ये पोस्ट केल्या आहेत. अंकिता वालावलकर तिच्या खास मालवणी शैलीत व्हिडीओ करताना दिसते. ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने ती प्रसिद्ध आहे. अंकिता फूड, पर्यटन याविषयी व्हिडीओ बनवते.
सध्या सोनाली महाराष्ट्र टुरिझम या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख प्रेक्षकांना करुन देत आहे. तर दुसरीकडे तिचा आगामी ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. महाराणी ताराबाई राजाराम भोसले यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून याचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले असून प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे क्रिएटिव्ह व्हाईब आणि समीर अरोरा हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे असून या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार अवधुत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे