Marathi Actress Shares Horror Experience : मनोरंजन सृष्टीतल्या अनेक अभिनेत्रींबरोबर बऱ्याचदा काही धक्कादायक घटना घडतात. असंच काहीसं एका मराठी अभिनेत्रीबरोबर घडलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश. एक अज्ञात व्यक्ती पाठलाग करत तिच्या घरी शिरली होती, याबद्दल स्वत: तिनेच खुलासा केला आहे. अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलेलं? चला जाणून घेऊ…

तेजस्वी प्रकाश हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तेजस्वीने एकता कपूरच्या ‘नागिन’सारख्या मालिकेतही मुख्य भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर तिने अनेक रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. अशातच आता अभिनेत्री एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. तेजस्वीने नुकतचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवलं आहे. ‘सायको सैया’ या शोमधून ती ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिच्या आयुष्यातील एका भयानक घटनेचा खुलासा केला आहे. एका अज्ञात व्यक्तीने तिचा पाठलाग करून, ती घरी एकटी असताना घरात प्रवेश केल्याचे सांगितले.

“एक माणूस माझा पाठलाग…”

‘न्यूज १८ शोशा’ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वी म्हणाली, “एक माणूस रोज माझ्या घरी यायचा. मी ‘रो-हाऊस’मध्ये राहत असल्याने घरासमोर अंगण आहे. तो रोज तिथे पत्रे टाकून जायचा. मी घराबाहेर पडले की, मला ती पत्रे दिसायची, पण तो नक्की कोण आहे हे समजत नसे. आम्ही सीसीटीव्ही कॅमेरेही लावले, पण तो त्या कॅमेऱ्यात कधीच सापडला नाही.”

“एक दिवस घरी एकटी असताना…”

पुढे तिने सांगितले, “एक दिवस मी घरी एकटी असताना तो थेट बाल्कनीतून आत शिरला. सुदैवाने त्याचवेळी माझी आई आणि ड्रायव्हर तिथे आले आणि त्यांनी त्याला बाल्कनीतच पकडले. करणने त्याला हँडल केलं आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.”

आपल्या कामामुळे चर्चेत राहणारी तेजस्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहत असते. गेल्या चार वर्षांपासून ती आणि करण कुंद्राला डेट करत आहेत. दोघांच्या लग्नाबद्दलच्या अनेक चर्चासुद्धा होताना दिसतात.

करण आणि तेजस्वी यांची लव्हस्टोरी २०२१ मध्ये ‘बिग बॉस १५’ पासून सुरू झाली. अलीकडेच दोघे ‘लाफ्टर शेफ सीझन ३’ शोमध्ये एकत्र दिसले होते. काही दिवसांपूर्वी करणने त्याच्या छातीवर तेजस्वीच्या चेहऱ्याचा टॅटू काढल्याचे फोटो व्हायरल झाले होते, मात्र तो टॅटू तात्पुरता (नॉन-परमनंट) असल्याचे त्याने नंतर स्पष्ट केले. दोघे सोशल मीडियावर सक्रीय असून एकमेकांबरोबरचे फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतात.