Marathi Actress Dance : ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. या मालिकेतील सगळेच कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले होते. अभिनेत्री वल्लरी विराज यामध्ये प्रमुख भूमिका साकारत होती. वल्लरीला या मालिकेमुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. यामध्ये वल्लरीच्या ऑनस्क्रीन बहिणीची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री आलापिनी निसळने साकारली होती. आलापिनी अन् वल्लरीचं ऑनस्क्रीन नातं सुद्धा अगदी बहिणीसारखं आहे. या दोघी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. या दोघींच्या डान्स व्हिडीओला चाहत्यांची विशेष पसंती मिळते.

जवळपास ५८ वर्षांपूर्वीच्या जुन्या गाण्यावर वल्लरी अन् आलापिनी यांनी सुंदर नृत्य सादरीकरण केलं आहे. “झुमका बरेली वाला, कानों में ऐसा डाला…” या सदाबहार गाण्यावर या दोघी थिरकल्या आहेत. या गाण्याचं मूळ नाव आहे ‘कजरा मुहब्बत वाला’! १९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किस्मत’ सिनेमात हे गाणं होतं. आशा भोसले आणि शमशाद बेगम यांनी हे सुपरहिट गाणं गायलं आहे. आज इतक्या वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.

या व्हिडीओमध्ये मजंठा रेड कलरच्या ड्रेसमध्ये वल्लरी अन् चॉकलेटी ड्रेसमध्ये आलापिनी खूपच सुंदर दिसतेय. वल्लरीने या व्हिडीओला “झुमका” असं कॅप्शन दिलं आहे. गाण्याच्या थीमप्रमाणे या गाण्यावर डान्स करताना दोघींनीही कानात मोठे झुमके घातल्याचं पाहायला मिळत आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “तुम्ही दोघीही किती सुंदर डान्स करता”, “हा परफॉर्मन्स खरंच खूप जास्त ग्रेसफूल होता…”, “वॉव खूपच सुंदर”, “शब्द कमी पडतील इतका सुंदर डान्स”, “तुम्हा दोघींचे एक्स्प्रेशन्स खरंच कमाल असतात”, “मस्त डान्स केलात”, “ग्रेस-एक्स्प्रेशन्स- परफेक्ट डान्स वॉव खरंच सुंदर”, “माय फेव्हरेट गर्ल्स”, “भारी परफॉर्मन्स”, “मस्त एक्स्प्रेशन्स खरंच” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, वल्लरी विराज आणि आलापिनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, वल्लरीची प्रमुख भूमिका असलेली ‘शुभ श्रावणी’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर, आलापिनी सध्या स्टार प्रवाहच्या ‘आनंदी’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. या दोघींच्या डान्स व्हिडीओवर चाहते नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात.