छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून वीणा जगतापकडे पाहिले जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच वीणा जगतापने आयफोन खरेदी केला आहे. याचा एक खास व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री वीणा जगतापने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती एका आयफोन विक्रेत्या शोरुममध्ये जाताना दिसत आहे. यावेळी त्या दुकानातील विक्रेता तिला आयफोन असलेली बॅग देतो. त्यानंतर ती त्या फोनचे अनबॉक्सिंग करते आणि आयफोन दाखवते. यावेळी तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे आनंद पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “मी नेहमी तुझ्याबरोबर…” वीणा जगताप आणि शिव ठाकरे पुन्हा येणार एकत्र, पोस्ट चर्चेत

वीणाने आयफोन १४ प्रो मॅक्स खरेदी केला आहे. वीणाने खरेदी केलेला हा फोन दीड लाखांच्या आसपास आहे. या व्हिडीओला वीणाने ‘सुकून मिला’ असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : “ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले

दरम्यान वीणा जगताप हिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. वीणा ही बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धी झोतात आली होती. त्यानंतर ती राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेत झळकली होती. त्याबरोबर तिने आई माझी काळुबाई या मालिकेतही काम केले होते. तिची ही भूमिका चांगलीच गाजली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress veena jagtap buy new iphone video share on instagram viral nrp
First published on: 08-12-2022 at 13:30 IST