scorecardresearch

Video : “मला भीती वाटत होती, पण केवळ त्यांच्यामुळे…” वीणा जगतापने सांगितला ‘तो’ किस्सा

वीणा जगतापने नुकतंच तिच्या युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

veena jagtap driving
वीणा जगताप

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून वीणा जगतापकडे पाहिले जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसापूर्वी वीणाने अधिकृत मेकअप कलाकार म्हणून पदवी मिळवली. त्यानंतर आता वीणाने तिच्या बकेट लिस्टमधील आणखी एक इच्छा पूर्ण केली आहे. नुकतंच तिने तिच्या व्हिडीओद्वारे याबद्दल सांगितले आहे.

वीणा जगतापने नुकतंच तिच्या युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने तिच्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. वीणा ही नुकतंच चार चाकी गाडी चालवायला शिकली आहे. यावेळी तिला काय आव्हाने आली? याबद्दल तिने सांगितली आहेत.
आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

वीणाने शेअर केलेल्या व्हिडीओत तिने ड्रायव्हिंगचे क्लास कसे घेतले? याबद्दल सांगितले आहे. “मी गेल्या २० दिवसांपासून चार चाकी गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहे आणि आज माझ्या प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस आहे. मला दुचाकी उत्तम चालवता येते. पण चार चाकीही व्यवस्थित चालवता यावी, अशी माझी खूप दिवसांपासून इच्छा होती, म्हणून मी प्रशिक्षण घेतले.” असे तिने म्हटले.

“मी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली, त्यावेळी मी गाडी शिकेन असं मला अजिबात वाटले नव्हते. आज मी खरंच खूपच आनंदी आहे. मला गाडी शिकताना खूप मज्जा आली. मी शिकेन की नाही, अशी मला भीती होती. पण मी खरंच मनापासून गाडी चालवण्यास शिकले.”

“मी पहिल्या दिवशी गाडी चालवायला हातात घेतली त्यावेळी मी ड्रायव्हर दादांना मला गाडी चालवायला येईल का? असे विचारले होते. पण त्यानंतर त्यांनी मला आत्मविश्वास दिला की, तुम्हाला आम्ही गाडी शिकवल्यावर तुम्ही नक्कीच शिकाल. त्यामुळेच मला दहाव्या दिवशीच गाडी चालवण्याचा आत्मविश्वास आला”, असे वीणा जगताप म्हणाली.

आणखी वाचा : Photos : मिताली मयेकरचा अंघोळ करतानाचा ‘तो’ फोटो पाहून नेटकरी संतापले, म्हणाले “मनावरचा ताबा…” 

दरम्यान वीणा जगताप हिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. वीणा ही बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धी झोतात आली होती. त्यानंतर ती ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेत झळकली होती. त्याबरोबर तिने ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतही काम केले होते. तिची ही भूमिका चांगलीच गाजली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 10:00 IST
ताज्या बातम्या