नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. ‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली विशाखा सुभेदार सध्या मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. नुकतीच विशाखाने माहेरपणाविषयी सुंदर पोस्ट लिहिली आहे; जी सध्या व्हायरल होतं आहे.

अभिनेत्री विशाखा सुभेदारने अनेक वर्षांनंतर भाऊबीज साजरी केली. याच भाऊबीज निमित्ताने विशाखाने भावाबरोबर फोटो शेअर करून सुंदर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने माहेरपणाविषयी खूप छान लिहिलं आहे; ज्याचं नेटकऱ्यांकडून कौतुक होतं आहे.

marathi actress vishakha subhedar dance with niece watch video
Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
Trupti Khamkar told why a Marathi actress was given the role of a woman working maid in Hindi movie
…म्हणून मराठी अभिनेत्रींना हिंदीत दिलं जातं कामवाल्या बाईचं काम, तृप्ती खामकरने सांगितलं पडद्यामागचं सत्य
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

हेही वाचा – Video: मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावावर झाले कर्णवेध संस्कार, पाहा व्हिडीओ

विशाखा सुभेदारची पोस्ट वाचा…

अनेक वर्षांनी आमची भाऊबीज साजरी झाली…दादा दिवाळीला दुबईला असायचा कारण सर्व्हिस…यावर्षी मात्र सुट्टी…आणि आमची भाऊबीज साजरी झाली…अचानक दोघांचे रंग जुळले…ट्युनिंग का काय म्हणतात तसं झालं… काल माहेरपण उपभोगलं. एक संपूर्ण दिवस…पूर्वी कसं लांबच्या गावात मुलगी दिलेली असायची…पोर माहेरपणाला आली की चांगलं महिनाभर रहायची…पण ते सुख जवळ लग्न होणाऱ्या पोरींच्या नशिबी फार कमी येतं…आमचं माहेरपण म्हणजे ७/८ तासांचं फारफार, लयं झालं तर चार दिवस..की आम्ही निघालो…अर्थात सासूबाई मागे लागायच्या, नवरा चल म्हणायचा असं काहीच नसायचं…आम्हालाच करमायचं नाही…आपण कधी एकदा आपल्या घरी जातोय असं वाटायचं..”दिल्या घरी सुखी रहा..”

पण खरंच असं खूपदा वाटतं सुट्ट्या काढून माहेरी जाता यायला पाहिजे…(आम्ही जायचो लहानपणी असे आईबरोबर, मावशीबरोबर ) आपापल्या भाच्याबरोबर दुपारी झाडाखाली पत्ते कुटता यायला पाहिजे…सुट्टीत आलेल्या बहिणीच्या उवा काढता आल्या पाहिजेत…भाच्यांचे पाढे पाठ करून घेता आले पाहिजेत…चिंचा फोडता आल्या पाहिजेत, झोके घेता आले पाहिजेत, भांडी घासता घासता आयुष्य बोलता बोलता डोळ्यात पाणी यायला हवं आणि पुसायला बहिणीचा, आईचा पदर असायला हवा…हे सगळं माहेरपण आमच्या आया मावशींनी अनुभवलं…आम्हा बच्चे कंपनीचे लाड करता करता… सकाळी गरम गरम चहा-चपाती, दुपारी आयत गरम त्यांच्या त्यांच्या आयांच्या हाताचं मटण, चिल्लसखेळ, बांगड्या नाचे खेळ आणि पोतपोत गहू निवडून देऊन आईच काम कमी करणं हे सगळे दुपारचे उद्योग आणि रात्री अंगणात गप्पा भावांडाबरोबर आणि मग जायची वेळ यायची. तेव्हा आम्ही रडत गाड्या पकडायचो…काय गंमत होती…पूर्वीच्या शेणाने सारवलेल्या माहेराची.

आजही माहेरची ओढ कायम पण वेळ कमी…धावपळीच आयुष्य…प्रेम आहेच ते असणारच…पण गोंजारायला वेळ नाही…फक्त धावपळ…पण जवळ असल्याने कधीही पाच मिनिटासाठी का होईना आईकडे डोकावत येतं. आईला सुद्धा वाटलं यावंसं तर येता येतं, हेही तितकच खरं…मज्जा असते सणवारी आणि सुट्टी मिळाली तरच मज्जा आहे…थोडं विषयांतर झालं पण मनात आलं ते लिहित गेले…तर भाऊबीज…नानांनंतर आत्ता दादा…तुला खूप खूप प्रेम…ओढ कायम…

हेही वाचा – …म्हणून मराठी अभिनेत्रींना हिंदीत दिलं जातं कामवाल्या बाईचं काम, तृप्ती खामकरने सांगितलं पडद्यामागचं सत्य

हेही वाचा – Video: “गरबा संपला ताई…”, इरिनाचा ‘नगाडा संग ढोल’वरील डान्स पाहून नेटकऱ्याची प्रतिक्रिया, उत्तर देत म्हणाली, “हो मला…”

दरम्यान, याआधी विशाखा सुभेदारचा भाची राधा शिंदेबरोबर डान्स व्हिडीओ खूप चर्चेत होता. विशाखाने भाचीबरोबर सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’ चित्रपटातील ‘नाच मेरी जान’ गाण्यावर डान्स केला होता. दोघींच्या डान्सने आणि हावभावाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

Story img Loader