marathi big boss update dr. rohit shinde evicted from the house spg 93 | ‘बिग बॉस' मराठीच्या घरातून डॉ. रोहित शिंदे बाहेर; इतर स्पर्धक झाले भावुक | Loksatta

‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून डॉ. रोहित शिंदे बाहेर; इतर स्पर्धक झाले भावुक

या आठवड्यात चार नॉमिनेटेड स्पर्धक होते

‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून डॉ. रोहित शिंदे बाहेर; इतर स्पर्धक झाले भावुक
फोटो सौजन्य : कलर्स मराठी

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. समृद्धी जाधव, तेजस्विनी लोणारी हे स्पर्धक घराबाहेर पडले आहेत. यांच्याबरोबरीने वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेले विशाल निकम आणि मीरा जगन्नाथ स्पर्धकदेखील बाहेर पडले, त्यांच्याबरोबरीने आणखीन एक स्पर्धक बाहेर पडला.

‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात झळकलेली बोल्ड जोडी म्हणजे अभिनेत्री रुचिरा जाधव आणि तिचा बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदे. यातील रुचिरा घराच्या बाहेर पडली आहे. तिच्या पाठोपाठ आता डॉ. रोहित शिंदे हा सुद्धा घराबाहेर पडला आहे. या आठवड्यात चार नॉमिनेटेड झालेल्या सदस्यांपैकी म्हणजेच अपूर्वा, प्रसाद, रोहित आणि अमृता देशमुख यांच्यापैकी रोहित शिंदेला घराबाहेर पडावे लागले. एलिमिनेश राउंडमध्ये रोहित शिंदेचे नाव घेताच इतर स्पर्धकदेखील भावुक झाले. रोहितने घर सोडताना घराला नमस्कार केला.

‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून ‘हे’ वाईल्ड कार्ड स्पर्धक बाहेर; नेमकं कारण काय?

रोहित हा पेशाने डॉक्टर आहे. त्याला मॉडेलिंगची देखील विशेष आवड आहे. ‘मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी मॉडेलिंग केलं आहे.त्याने काही ब्रँडसाठी रॅम्पवॉकही केले आहे. रोहितला फिटनेसची विशेष आवड आहे. तो सोशल मीडियावर ही सक्रीय असतो.

“ज्या हॉटेलमध्ये मी एक रात्र राहिले त्याचे कर्मचारीच…” तेजस्विनी लोणारीने सांगितला ‘तो’ अनुभव

पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? यासाठी कार्यक्रम पुढच्या आठवडयात बघावा लागेल…

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 23:34 IST
Next Story
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून ‘हे’ वाईल्ड कार्ड स्पर्धक बाहेर; नेमकं कारण काय?