scorecardresearch

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस’ रजेवर, तर राखी सावंतसह चॅलेंजर्स चालवणार घर, पॉवर मिळताच ड्रामा क्वीनची मनमानी

Bigg Boss Marathi Twist: जुने स्पर्धक त्रास सहन करणार की नव्या बॉसविरुद्ध बंड पुकारणार

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस’ रजेवर, तर राखी सावंतसह चॅलेंजर्स चालवणार घर, पॉवर मिळताच ड्रामा क्वीनची मनमानी
(फोटो – व्हिडीओतून स्क्रीन शॉट)

‘बिग बॉस मराठी’मध्ये रविवारी चार वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एंट्री झाली. हिंदी बिग बॉसमधील राखी सावंतसह, आरोह वेलणकर, विशाल निकम आणि मीरा जगन्नाथ हे आधीच्या पर्वातील स्पर्धक चॅलेंजर्स म्हणून बिग बॉसच्या घरात आले आहेत. राखीच्या येण्याने घरात आधीच गोंधळ पाहायला मिळतोय, त्यातच आता शोमध्ये आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या नव्या प्रोमोत या ट्विस्टबद्दल माहिती देण्यात आली आहे.

या व्हिडीओमध्ये आपण सुट्टीवर जाणार असल्याची स्वतः बिग बॉस करताना दिसत आहेत. बिग बॉस सुट्टीवर गेल्यानंतर या घरातील सर्व कामकाज नवीन आलेले वाईल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंत, आरोह वेलणकर, विशाल निकम आणि मीरा जगन्नाथ चालवणार आहेत. बिग बॉस परत येईपर्यंत हे चारही जण घरातील नवीन बॉस असतील. बिग बॉसने यासंदर्भात घोषणा करताच राखीचे बदलेले रुप पाहायला मिळते. ती घरातील बाथरुम चार बॉसशिवाय कुणालाही वापरता येणार नसल्याचं जाहीर करते. तिच्या बोलण्यानंतर घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचं दिसतंय.

दरम्यान, बिग बॉसच्या या नवीन ट्विस्टमुळे घरातल्या सदस्यांवर त्याचा काय परिणाम होतो, तसेच नवीन आलेले स्पर्धक बिग बॉस नसताना घरात काय गोंधळ घालतात, घरातील इतर सदस्य या नवीन बॉसचं म्हणणं ऐकतात की बंड पुकारतात, हे आगामी एपिसोड्समध्ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 19:16 IST

संबंधित बातम्या