Marathi Actor New Home : मुंबईसारख्या स्वप्ननगरीत आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यंदाच्या वर्षी अनेक मराठी कलाकारांनी नवीन घर खरेदी केल्याचं पाहायला मिळालं. काही महिन्यांपूर्वीच मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी मधुरा जोशी व गुरु दिवेकर यांनी नवीन घर खरेदी केलं होतं. आता या पाठोपाठ मराठी कलाविश्वातील आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याने चाहत्यांबरोबर नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. ही जोडी कोण आहे पाहुयात…
‘सन मराठी’च्या ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता पुष्कर सरद आणि त्याची पत्नी अभिनेत्री अमृता चंद्रप्रभा यांनी नुकतंच नवीन घर घेतलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.
पुष्कर व अमृता यांनी नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर करताच चाहत्यांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याशिवाय मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनी सुद्धा पुष्कर-अमृताचं कौतुक केलं आहे.
अभिनेता पुष्कर सरदला ‘कट्टी बट्टी’ या मालिकेमुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. याशिवाय स्टार प्रवाहच्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत सुद्धा त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सध्या तो सन मराठीच्या ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

याशिवाय पुष्करची पत्नी अभिनेत्री अमृता चंद्रप्रभाबद्दल सांगायचं झालं, तर तिने ‘बॉस माझी लाडाची’ आणि स्टार प्रवाहच्या ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
