Marathi Serial TRP : सणासुदीच्या काळात, आयपीएलचा हंगाम किंवा क्रिकेट सामने सुरू झाल्यावर मालिकांच्या टीआरपीमध्ये बऱ्याचदा घसरण होते. यंदाही दिवाळीच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजेच १८ ते २४ ऑक्टोबर दरम्यान जवळपास आघाडीच्या सगळ्याच मालिकांच्या टीआरपीमध्ये घसरण झाली आहे. नेहमीप्रमाणे या यादीत सायली-अर्जुनची ‘ठरलं तर मग’ मालिका पहिल्या स्थानी आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर जानकीच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेचा क्रमांक लागतो. सध्या या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळतेय. तर, आदिनाथ कोठारेची ‘नशीबवान’ मालिका या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. टीआरपीच्या यादीच चौथ्या अन् पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे ‘तू ही रे माझा मितवा’ आणि ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या मालिकांनी स्थान मिळवलं आहे.
‘झी मराठी’च्या मालिकांबद्दल सांगायचं झालं, तर ‘कमळी’ मालिका ३.६ रेटिंगसह टीआरपी चार्टमध्ये सातव्या स्थानी आहे. मात्र, ‘कमळी’ला ‘झी मराठी’वाहिनीवर सर्वाधिक टीआरपी आहे. यानंतर ‘लक्ष्मी निवास’, ‘तारिणी’ अन् त्यानंतर ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे दिवाळीच्या आठवड्यात शिवानी सोनारच्या ‘तारिणी’ने तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेपेक्षा जास्त टीआरपी मिळवला आहे.
मराठी मालिकांचा टीआरपी
१.ठरलं तर मग – ५.०
२.घरोघरी मातीच्या चुली – ४.१
३.नशीबवान – ४.०
४.तू ही रे माझा मितवा – ३.९
५.कोण होतीस तू, काय झालीस तू! – ३.९
६. लक्ष्मीच्या पाऊलांनी – ३.८
७.कमळी, लग्नानंतर होईलच प्रेम – ३.६
८. येड लागलं प्रेमाचं – ३.५
९.लक्ष्मी निवास – ३.०
१०.तारिणी – २.८
११.वीण दोघांतली ही तुटेना – २.७
दिवाळी संपल्यावर ‘काजळमाया’ ही मालिका नुकतीच ( २७ ऑक्टोबर ) प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता या मालिकेचा लॉन्च टीआरपी पुढच्या आठवड्यात प्रेक्षकांसमोर येईल. दरम्यान, कमळी ( ३.६ ) आणि नशीबवान ( ४.० ) मालिकांमध्ये आता रात्री नऊ वाजताची स्लॉट लीडर मालिका होण्यासाठी जोरदार चुरस रंगली आहे. आता ‘कमळी’ यामध्ये बाजी मारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
