Marathi Serial TRP : २०२५ च्या अखेरच्या आठवड्यात टीआरपीमध्ये कोणी बाजी मारली? कोणत्या मालिकांना प्रेक्षकांनी पसंती दिली याची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. BARC इंडियाने २१ डिसेंबर ते २७ डिसेंबर या आठवड्याचा टीआरपी नुकताच जाहीर केला आहे. नेहमीप्रमाणे सायली-अर्जुनच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. गेली तीन वर्षे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सातत्याने अव्वल स्थानी आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे अर्णव-ईश्वरीची ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका. प्राइम स्लॉट मिळाल्यापासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत कायम दुसऱ्या स्थानी असते. यानंतर तिसरं स्थान ‘कमळी’ने मिळवलं आहे. ‘कमळी’ या आठवड्यात स्लॉट लीडर सुद्धा ठरली आहे. याशिवाय ‘कमळी’ने ‘झी मराठी’वर सर्वाधिक टीआरपी मिळवला आहे.

काव्या-पार्थ आणि जीवा-नंदिनीच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत सध्या ‘मिशन लग्नासाठी काहीपण’ हा ट्रॅक सुरू आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. ‘कमळी’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या तिन्ही मालिकांना २१ ते २७ डिसेंबर दरम्यान ४.२ TVR मिळाला आहे.

Award Banner

शिवानी सोनारची ‘तारिणी’ मालिका सलग दुसऱ्या आठवड्यात ९:३० वाजता स्लॉट लीडर ठरली आहे. यामुळे केदार-तारिणीचं ‘मिशन गृहप्रवेश’ यशस्वी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर ३.८ रेटिंगसह ‘लक्ष्मी निवास’ मालिका सहाव्या स्थानी आहे. तर, तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिका सातव्या स्थानी असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या टीआरपीच्या आकडेवारीवरून पाहायला मिळत आहे.

मराठी मालिकांचा TRP

१. ठरलं तर मग – ५.४
२. तू ही रे माझा मितवा – ४.६
३. कमळी – ४.२
लग्नानंतर होईलच प्रेम – ४.२
घरोघरी मातीच्या चुली – ४.२
४. नशीबवान – ४.१
५. तारिणी – ३.८
६. लक्ष्मी निवास – ३.७
७. वीण दोघांतली ही तुटेना – ३.५
८. वचन दिले तू मला – ३.४
९. देवमाणूस – ३.१
१०. येड लागलं प्रेमाचं – २.९

‘स्टार प्रवाह’वर नव्याने सुरू झालेली ‘वचन दिले तू मला’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आठव्या स्थानी आहे. तर, ‘काजळमाया’ टॉप-१५ मध्येही नाहीये. याशिवाय गेल्या काही महिन्यांत ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेचा टीआरपी सुद्धा घसरला आहे. टीआरपीच्या दृष्टीकोनातून आता लवकरच वाहिनीवर काही महत्त्वाचे बदल केले जातील. काही नव्या मालिका सुरू होणार आहेत, तर रेश्मा शिंदेच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे.