छोट्या पडद्यावरील ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ हा लोकप्रिय शो आहे. या शोचा सातवा सीझन अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ या कुकिंग शोचे पहिल्या सीझनपासूनच चाहते आहेत. सोनी टीव्हीवरील या शोचे रणवीर ब्रार, गरिमा अरोरा आणि विकास खन्ना हे तीन शेफ परीक्षक आहेत.
‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’च्या सातव्या पर्वाच्या फायनल काही आठवडे शिल्लक असतानाच या शोचा विजेता प्रेक्षकांना समजला आहे. हा विजेता दुसरा तिसरा कोणी नसून नयनज्योती आहे. नयनज्योतीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये त्याने ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ची सातव्या पर्वाची ट्रॉफी हातात घेतली आहे. विजेत्याला मिळणारा गोल्डन कोटही त्याने परिधान केल्याचं फोटोत दिसत आहे.
हेही वाचा>> “आम्ही रात्री एकत्र …” सतीश कौशिक यांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या व्यावसायिकाने सांगितला घटनाक्रम
ट्विटरवरील एका फॅन पेजवरुन नयनज्योतीचा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. “शेवट चांगला झाला. नयनज्योतीने ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’च्या सातव्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं”, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. त्यामुळे नयनज्योती मास्टरशेफ ऑफ इंडिया बनल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा>> Video: ऑस्कर मिळालेल्या ‘नाटू नाटू’ गाण्यावर राखी सावंतचा डान्स, नेटकरी ट्रोल करत म्हणाले “ते अवॉर्ड…”
दरम्यान, लोकप्रिय असलेल्या ‘मास्टर शेफ ऑफ इंडिया’च्या सातव्या पर्वाला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. शाकाहारी असलेल्या अरुणा विजय या स्पर्धकाला परीक्षकांनी मटणऐवजी पनीरपासून डिश बनवण्याची मुभा दिली होती. त्यामुळे या शोला ट्रोल करण्यात आलं होतं.