scorecardresearch

Premium

Video: लाडक्या बाप्पाला निरोप देताना ‘परी’ला कोसळलं रडू; म्हणाली, “देवबप्पा, का रे…”

गणपती बाप्पाचे विसर्जन करताना मायरा वैकुळला अश्रू अनावर, व्हिडीओ व्हायरल

Mazhi Tuzhi Reshimgaath Pari Fame Myra vaikul cried at ganesh visarjan video viral
बाप्पाला निरोप देताना ढसाढसा रडली 'परी' (फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. ज्यांच्या घरी पाच दिवसांचा गणपती बसतो, त्यांनी बाप्पाचं विसर्जन केलं आहे. अनेक मराठी सेलिब्रिटींकडेही गणपती बाप्पाचं आगमन होतो. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम परी म्हणजे बालकलाकार मायरा वैकुळच्या घरीही बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.

‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला गेलेला विकी कौशल गर्दीत अडकला; पोलिसांनी केली मदत, व्हिडीओ व्हायरल

Marathi actor kiran mane talk about mahatma gandhi
“खरंच हा देश ‘डरे हुए’ किंवा ‘डराए गये’ लोगोंका झालाय” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले…
Akshara-Adhipati
‘असा’ असेल अक्षरा-अधिपतीचा राजेशाही विवाह सोहळा, लग्नात येणारे ट्विस्ट अँड टर्न्स समोर, घ्या जाणून
johnny lever gifted gold pendant to namrata sambherao
हास्यजत्रेतील ‘ते’ स्किट पाहून भारवले होते जॉनी लिवर, सेटवर नम्रता संभेरावला दिलेलं महागडं गिफ्ट; म्हणाली, “सोन्याचं…”
akshaya_hardeek
अक्षयाला मोदक करता येतात का? हार्दिक जोशीने दिलेल्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाला…

पाच दिवसांनी बाप्पांना निरोप देताना मायरा वैकुळला रडू कोसळलं. मायराच्या इन्स्टाग्रामवर बाप्पाच्या आगमनापासून ते त्यांच्या विसर्जनापर्यंतचे काही व्हिडीओ शेअर करण्यात आलेत. त्यात विसर्जनाच्या व्हिडीओत मायरा रडताना दिसत आहे. “देवबप्पा, का रे सोडून गेलास मला? रागावलास का माझ्यावर? खरं सांगू आता तुझी खूप आठवण येईल. पुढच्या वर्षी मी तुला खूप मोदक व लाडू खाऊ घालेन, पण तू लवकर ये, मी तुझी वाट बघतेय” असं ती व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.

दरम्यान, मायरा सध्या ‘निरजा एक नई पेहचान’ या हिंदी मालिकेत काम करत आहे. मायरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिच्या अकाउंटवरून तिचे अनेक व्हिडीओ व फोटो शेअर केले जातात. नुकतंच तिने ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर चिमुकल्या साईराज केंद्रेबरोबर डान्सही केला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mazhi tuzhi reshimgaath pari fame myra vaikul cried at ganesh visarjan video viral hrc

First published on: 23-09-2023 at 18:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×