scorecardresearch

अखेर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका होणार बंद! ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

‘माझी तुझी रेशीमगाठ’ घेणार प्रेक्षकांचा निरोप; मालिका बंद होणार असल्यामुळे चाहते नाराज

अखेर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका होणार बंद! ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग
'माझी तुझी रेशीमगाठ' होणार बंद. (फोटो: झी मराठी/ इन्स्टाग्राम)

‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील यश-नेहाच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तर परीच्या क्यूटनेसची प्रेक्षकांना भूरळ पडली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. मालिकेतील कलाकरांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. परंतु, आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘झी मराठी’ वाहिनीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरुन मालिका निरोप घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका बंद होणार असून या मालिकेचा शेवटचा भाग २२ जानेवारी रोजी प्रसारित होणार आहे. रविवारी रात्री ९:०० वाजता एक तासाचा विशेष महाएपिसोड प्रसारित करुन ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यापूर्वी ही मालिका बंद करणार असल्याचे संकेत मालिकेच्या टीमने दिले होते. तेव्हा प्रेक्षकांच्या मागणीमुळे मालिकेच्या कथानकात ट्वीस्ट आणून ते पुढे सरकवलं गेलं. परंतु, आता मालिका बंद होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

हेही वाचा>>अनंत-राधिकाच्या साखरपुड्यात ‘वाह वाह रामजी’वर थिरकले मुकेश अंबानी व नीता अंबानी; व्हिडीओ व्हायरल

हेही पाहा>> Birthday Special: गौरव मोरेला केसांमुळे मिळालेली गुगलची जाहिरात; स्वत:च सांगितलेला किस्सा

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका बंद होणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये नाखूश असल्याचं दिसत आहे. मालिका निरोप घेणार असल्याच्या झी मराठीच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांची नाराजी दर्शविली आहे. “प्लीज मालिका बंद करू नका”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एका चाहत्याने “माझी तुझी रेशीमगाठ बंद करू नका, ही विनंती आहे”, असं म्हटलं आहे. “ह्या टीमबरोबर दुसरी मालिका लवकर घेऊन या”, असं म्हणत प्रेक्षकांनी नवीन मालिकेची मागणी केली आहे.

हेही वाचा>> ‘वेड’ चित्रपटाची ५० कोटींची कमाई पाहून सिद्धार्थ जाधव भारावला, पोस्ट शेअर करत म्हणाला…

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे व अभिनेता श्रेयस तळपदे यांनी मुख्य भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तर बालकलाकार मायरा वायकुळ परीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 16:11 IST

संबंधित बातम्या