'खतरों के खिलाडी' या धोकादायक स्टंटने भरलेल्या रिॲलिटी शोचा १३ वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. धोकादायक स्टंटने भरलेल्या या खेळाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यंदाच्या १३ व्या सिझनमध्ये शिव ठाकरे आणि प्रियंका चहर चौधरी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यानंतर आता या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आता रॅपर एमसी स्टॅनच्या नावाची चर्चा सुरु आहे. अब्दु रोझिकशी भांडणामुळे स्टॅन चर्चेत आहे. अब्दूने स्टॅन फोन उचलत नाही, आपल्याबद्दल माध्यमात खोटी माहिती पसरवतो, असाही आरोप केला होता. अब्दू, शिव आणि स्टॅन हे तिघेही बिग बॉसच्या घरात मंडलीचा भाग होते, पण आता मात्र मंडलीमध्ये दुरावा येईल, असं दिसतंय. हेही वाचा- Video : दीपिका पदुकोण व रणवीर सिंगमध्ये बिनसलं? बायकोचा हात पकडायला गेला पण…; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तिने दुर्लक्ष…” 'टेलिचक्कर'च्या रिपोर्टनुसार, यावेळी शोमध्ये रॅपर एमसी स्टॅन देखील दिसणार आहे. शोच्या निर्मात्यांनी त्याला ऑफर दिल्याची माहिती आहे, परंतु त्याने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या तो देशभरात त्याच्या कॉन्सर्टमध्ये व्यग्र आहे. बिग बॉसचा १६ ला सीझन जिंकल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. जर एमसी ने खतरों के खिलाडीच्या नव्या सीझनमध्ये भाग घेतला तर या शो चा टीआरपी गगनाला भिडू शकतो. तसेच मीडिया रिपोर्ट्स खरे ठरले आणि शिव व प्रियांकाही या रिअॅलिटी शोमध्ये दिसले तर बिग बॉसमधील सदस्य पुन्हा एकदा एकमेकांविरोधात टास्क करताना दिसतील. हेही वाचा- ‘३ इडियट्स’च्या सीक्वलबद्दल करीना कपूरचा मोठा खुलासा; राग व्यक्त करत म्हणाली “माझ्याशिवाय…” 'खतरों के खिलाडी'च्या १३वा सीझनचे शूटिंग केपटाऊनऐवजी अर्जेंटिनामध्ये होणार आहे. जिथे सीझन ७ आणि सीझन ९ चे शूटिंग आधीच झाले होते. तसेच यामध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्जेंटिनामध्ये जाऊ शकतात. पण यंदाच्या सीझनमध्ये नेमके कोणते स्पर्धेक पहायला मिळतील याबाबत उत्सुक्तता लागली आहे. खतरों के खिलाडीच्या नव्या सीझनचे हे असतील स्पर्धेक नुकतीच बातमी आली होती की नागिन ६ फेम सिंबा नागपाल देखील यावेळी 'खतरों के खिलाडी'चा भाग असणार आहे. अद्याप तिच्या नावाची पुष्टी झालेली नाही. 'बिग बॉस १६' फेम शिव ठाकरे, अर्चना गौतम, सौंदर्या शर्मा, प्रियांका चहर चौधरी, लॉक अप १ विजेता मुनावर फारुकी आणि अंजली अरोरा यंदाच्या खतरों कें खिलाडीच्या नव्या सीझनचे स्पर्धेक असणार आहेत.