scorecardresearch

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी शेअर केला अ‍ॅक्टिंगच्या दिवसांतील Throwback फोटो; म्हणाल्या, “आमचाही…”

स्मृती इराणी बऱ्याचदा त्यांचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. असाच एक फोटो सध्या चर्चेत आहे.

smriti irani
(फोटो – इंडियन एक्सप्रेस व इन्स्टाग्रामवरून साभार)

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. पूर्वी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या स्मृती इराणी राजकारणात आल्या आणि अभिनयाला त्यांनी रामराम केला. पण, त्या राजकारणातही त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे वेगळा ठसा उमटवत आहेत.

पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच दिग्दर्शक जोसेफ मनूचं निधन, अवघ्या ३१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्मृती इराणी बऱ्याचदा त्यांचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला ‘हमारा भी एक जमाना था’ म्हणजेच आमचाही एक जमाना होता, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच चाहते त्यावर कमेंट्स करत आहेत.

सोनू सूद, सूरज थापर यांच्यासह अनेक कलाकारांनी कमेंट्स करत त्यांच्या या लूकचं कौतुक केलं आहे. त्यांचा हा फोटो जवळपास दोन दशकं जुना असावा, असं त्यातील लूकवरून दिसतंय.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 12:45 IST