मनसेचा शिव ठाकरेला पाठिंबा! अमेय खोपकर पोस्ट करत म्हणाले, "बिग बॉस हिंदी..." | Mns leader amey khopkar supported shiv thakre for bigg boss 16 grand finale | Loksatta

मनसेचा शिव ठाकरेला पाठिंबा! अमेय खोपकर पोस्ट करत म्हणाले, “बिग बॉस हिंदीमध्ये…”

शिव ठाकरेसाठी अनेक कलाकार पाठिंब्याच्या पोस्ट टाकत आहेत. अशातच आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी शिवचं कौतुक केलं आहे.

amey khopkar shiv thakre
शिव ठाकरे बिग बॉस हिंदीच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचला आहे.

‘बिग बॉस १६’ चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या शोमध्ये मराठमाोळा शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियंका चहर चौधरी व अर्चना गौतम हे टॉप ५ स्पर्धक आहेत. या पाच जणांपैकी बिग बॉसची ट्रॉफी घरी कोणा नेणार, काही दिवसांतच स्पष्ट होईल. ‘मराठी बिग बॉस’चा विजेता शिव ठाकरेदेखील फिनालेमध्ये पोहोचला आहे. शिवला महाराष्ट्रातून खूप पाठिंबा मिळताना दिसत आहे.

शिव ठाकरेसाठी महेश मांजरेकरांची खास पोस्ट, ‘बिग बॉस’ स्टारचा फोटो शेअर करत म्हणाले…

शिव ठाकरेसाठी अनेक कलाकार पाठिंब्याच्या पोस्ट टाकत आहेत. मराठी बिग बॉसचे होस्ट व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी शिवसाठी पोस्ट केली होती. तो बेस्ट असल्याचं त्यात त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनीही व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शिवला वोट देण्याचं आवाहन केलं होतं. आता मनसेकडूनही शिव ठाकरेला पाठिंबा मिळाला आहे.

शिव ठाकरेसाठी महेश मांजरेकरांसह इतरही मराठी कलाकार एकवटले, तर ‘बिग बॉस’ स्टार्सचे आई-वडील म्हणतात, “आमचा लेक…”

मनसे नेते अमेय खोपकर यांनी एक पोस्ट करत शिवला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच त्यांनी शिवला ग्रँड फिनालेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. “आमच्या सर्वांचा अभिमान, महाराष्ट्राची शान शिव ठाकरे ‘बिग बॉस हिंदी’च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचला आहे. अंतिम फेरीसाठी शुभेच्छा”, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या पाच महिन्यांपासून हा शो सुरू आहे. प्रेक्षकांचा शोला मिळणारा प्रतिसाद पाहून याचा कालावधी वाढवण्यात आला होता. येत्या रविवारी म्हणजेच १२ फेब्रुवारी रोजी या शोचा ग्रँड फिनाले होईल, असं म्हटलं जातंय.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 07:47 IST
Next Story
शिव ठाकरेसाठी महेश मांजरेकरांसह इतरही मराठी कलाकार एकवटले, तर ‘बिग बॉस’ स्टार्सचे आई-वडील म्हणतात, “आमचा लेक…”