scorecardresearch

“…तर कार्यक्रमात धुडगूस घालू” एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टला मनसेचा विरोध, नेमकं प्रकरण काय?

एमसी स्टॅनच्या नागपूरमधील कॉन्सर्टला मनसेचा विरोध

mc stan mns
एमसी स्टॅनच्या नागपूरमधील कॉन्सर्टला मनसेचा विरोध. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बिग बॉस १६’ विजेता रॅपर एमसी स्टॅनचे देशभरात कॉन्सर्ट सुरू आहेत. शुक्रवारी(१७ मार्च) स्टॅनच्या इंदौरमधील कॉन्सर्टमध्ये बजरंग दलाने हंगामा करत कार्यक्रम रद्द केला होता. स्टॅनच्या गाण्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टला विरोध केला आहे.

इंदौरमधील कॉन्सर्टनंतर आज (शनिवार, १८ मार्च) स्टॅनचं नागपूर येथे कॉन्सर्ट होणार आहे. या कॉन्सर्टला मनसेने विरोध दर्शविला आहे. बजरंग दलाप्रमाणेच मनसेच्या कार्यकर्त्यांनीही स्टॅनच्या गाण्यांवर आक्षेप घेतला आहे. एमसी स्टॅन त्याच्या रॅपमध्ये अश्लील भाषा वापरत असल्याचा आरोप मनेसेने केला आहे. याशिवाय, स्टॅन त्याच्या गाण्यांतून मादक पदार्थांचं सेवन करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

हेही वाचा>> मनोज बाजपेयीला “नशेडी” म्हणणं पडलं महागात, बॉलिवूड अभिनेत्यावर अटकेची टांगती तलवार

हेही वाचा>> “शाहरुख खान मला गुडघ्यापर्यंत कपडे…” गौरी खानने केलेला खुलासा

“एमसी स्टॅनला नागपूर शहरात कुठल्याही कार्यक्रमासाठी येऊ देणार नाही. हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सहन होणार नाही. त्यामुळे नागपूर शहरात अणि जिल्ह्यात एमसी स्टॅन याला येऊ देणार नाही” असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. “या कार्यक्रमाला जर शासनाने जर परवानगी दिली तर आम्ही त्याच्या कार्यक्रम स्थळी जाऊन धुडगूस घालू’ असा आक्रमक इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 12:42 IST