scorecardresearch

“मी सध्या लग्नाचा…” मोहित रैनाने घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर सोडलं मौन

मोहित रैना पत्नी अदिती शर्मापासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. पण आता मोहितने या सर्व चर्चांवर मौन सोडलं आहे

“मी सध्या लग्नाचा…” मोहित रैनाने घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर सोडलं मौन
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

टीव्ही अभिनेता मोहित रैना मागच्या काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याने इन्स्टाग्रामवरून लग्नाचे सर्व फोटो डिलिट केले आहेत. त्यानंतर मोहित रैना पत्नी अदिती शर्मापासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अशातच मोहितने अलिकडेच इन्स्टाग्रामवर आणखी एक फोटो शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘नवी सुरुवात’ असं लिहिलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा होत होत्या. पण आता मोहितने या सर्व चर्चांवर मौन सोडलं आहे.

मोहित रैना आणि अदिती शर्माशी १ जानेवारी २०२२ ला लग्न केलं होतं. सोशल मीडियावर लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत मोहितने याची माहिती चाहत्यांनी दिली होती. मात्र आता एक फोटो वगळता मोहितने लग्नाचे आणि लग्नानंतरचे सगळे फोटो सोशल मीडियावरून डिलिट केले आहेत. अभिनेत्याच्या या कृतीनंतर चाहत्यांनी त्याला बरेच प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. पण आता वैवाहिक आयुष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत मोहितने यामागचं सत्य सांगितलं.

आणखी वाचा- Video: “मेरा दिल ये पुकारे…” गाण्यावर थिरकले अमिताभ बच्चन, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

‘इ-टाइम्स’शी बोलताना मोहित रैना म्हणाला, “हा काय मूर्खपणा आहे. या सर्व अफवा निराधार आहेत. मी सध्या हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि माझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे.” एवढंच नाही तर त्याने सोशल मीडियावर एक तिथला एक फोटो शेअर केला आहे. यावरून स्पष्ट होतं की मोहित आणि त्याच्या पत्नीत सर्वकाही ठीक आहे. पण लग्नाचे फोटो डिलिट करण्यामागचं कारण मात्र मोहितनं सांगितलं नाही.

आणखी वाचा- “विदेशी मातेच्या पोटी जन्मलेला मुलगा…”; ‘चाणक्यनिती’चा उल्लेख करत प्रसिद्ध गीतकाराचा राहुल गांधींवर हल्लाबोल

mohit raina insatgram

मोहित रैनाच्या कामाबद्दल बोलायचं तर, त्याने टीव्हीनंतर २०२९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’मधून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने काही वेबसीरिजमध्येही काम केलं. प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई डायरीज’ यातील त्याची भूमिका चांगलीच गाजली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 19:10 IST

संबंधित बातम्या