छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध व सुपरहिट ठरलेली अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानिसला ओळखलं जातं. ‘तू तिथे मी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘हे मन बावरे’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. मृणालच्या सगळ्याच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. करिअरच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

मृणालने २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. यानंतर काही वर्षे तिने मालिकांमध्ये काम केलं. त्यानंतर मृणाल नवऱ्याबरोबर अमेरिकेला राहायला गेली होती. तिने हा सगळा प्रवास नुकत्याच ‘दिल कें करीब’ला दिलेल्या मुलाखतीत उलगडला आहे. मृणालचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं आहे. करिअरच्या शिखरावर असताना मृणाल लग्नबंधनात अडकली. त्यानंतर काही वर्षे ‘हे मन बावरे’ मालिकेत काम करून मृणाल अमेरिकेत राहायला गेली.

हेही वाचा : Video : ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’च्या मंचावर ‘नाच गं घुमा’! भरत जाधव, अलका कुबल यांचा जबरदस्त डान्स

मृणाल नुकतीच चार वर्षांनी भारतात परतली आहे. याबद्दल पोस्ट शेअर करून तिने तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. आता पुन्हा एकदा मालिकेत पुनरागमन केव्हा करणार याबद्दल अभिनेत्रीचे चाहते तिच्याकडे विचारपूस करत आहे. याबद्दल मृणाल सांगते, “अनेकांना असं वाटतंय मी केवळ सुट्ट्यांसाठी भारतात आले आहे. पण, असं नाहीये मी आता कायमस्वरुपी भारतात राहायला आले आहे.”

हेही वाचा : “सर्वात चांगली आई…”, मातृदिनानिमित्त रितेश देशमुखने शेअर केला खास व्हिडीओ; जिनिलीया कमेंट करत म्हणाली…

सुलेखा तळवलकरांच्या ती ( मृणाल ) सध्या काय करते? या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “आताच मी काही दिवसांपूर्वी अमेरिकेहून भारतात आली आहे. त्यामुळे सध्या मी फक्त माझं घर लावतेय. मी आता ठाण्याला शिफ्ट होऊन सगळ्या गोष्टी पूर्वपदावर आणतेय. तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मुलीचं रुटीन मी लावतेय कारण, अमेरिकेहून भारतात येणं हा तिच्यासाठी पण मोठा बदल होता. माझ्या लेकीचं नाव नुर्वी आहे. आशीर्वाद या अर्थानुसार मी तिचं नाव ठेवलंय. आमच्या लग्नाला आता ८ वर्षे झाली. सुरुवातीला कामामुळे आम्हाला एकमेकांना वेळ देता आला नाही. पण, मी अमेरिकेला गेल्यावर आम्हाला एकत्र राहता आलं, वेळ देता आला. मग, आम्हाला बाळ झालं. एकंदर चार वर्षे छान गेली आणि आता हळुहळू मी कामाला सुरुवात करणार आहे.”