Premium

मिम शेअर करत गौतमी देशपांडे बहिणीला दिली गाढवाची उपमा, नंतर मृण्मयीने असं काही उत्तर दिलं की…

मृण्मयीच्या उत्तराने गौतमीने केलेली ही मस्करी तिच्यावरच उलटलेली दिसली.

mrunmayee gautami

मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजनसृष्टीतील बहिणींची लोकप्रिय जोडी. आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणेच गौतमीनेही कलाविश्वात तिचं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या कामाबरोबरच त्या दोघी त्यांच्यातल्या बॉंडिंगमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. मृण्मयी आणि गौतमी या बहिणींमध्ये त्यांच्या नात्यापलीकडची मैत्री पाहायला मिळते. आता गौतमीने शेअर केलेला एक फोटो खूप चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौतमी आणि मृण्मयी एकमेकींना जितका पाठिंबा देताना दिसतात तितक्याच त्या एकमेकींशी सोशल मीडियावर भांडतानाही दिसतात. आता गौतमीने गाढवाचा एक फोटो शेअर करत त्यात तिच्या ताईला, म्हणजेच मृण्मयीला, टॅग केलं. पण यावर मृण्मयीने गौतमीला जे उत्तर दिलं ते पाहून गौतमीने केलेली ही मस्करी तिच्यावरच उलटलेली दिसली.

आणखी वाचा : Video: “मला त्रास देणं बंद कर…” वैतागलेल्या गौतमीला बहिणीचं भन्नाट उत्तर, म्हणाली…

गौतमी सोशल मीडियावर सक्रिय राहून नेहमीच तिच्या बहिणीबद्दल व्यक्त होत असते. आता मस्करीत तिने एक मिम तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केलं. यामध्ये एक युनिकॉनचा फोटो आहे आणि एक गाढवाचा फोटो आहे. युनिकॉनच्या फोटोवर लिहिलं आहे की, तुमच्या बहिणीला वाटतं की ती अशी आहे. तर गाढवाच्या फोटोवर लिहिलं आहे की, पण ती अशी असते. हे मिम शेअर करत तिने मृण्मयी देशपांडेला त्यात टॅग केलं.

ही स्टोरी रिपोस्ट करत मृण्मयीनेदेखील तिच्या बहिणीला जशास तसं उत्तर देत गप्प केलं. मृण्मयीने लिहिलं, “पोस्टची वेळ चुकली गौत्या… आत्ताच UK मधून आले आहे आणि तुझ्यासाठी खूप काही आणलं होतं. पण आता सगळं विसर बाळा.”

हेही वाचा : “गेल्या दोन वर्षात…” मृण्मयी देशपांडेचा ‘तो’ फोटो बघताच वैतागली गौतमी; कमेंट चर्चेत

आपल्या ताईने उत्तर दिल्यावर गौतमीला नमतं घ्यावं लागलं. यावर उत्तर देत गौतमीने तिच्या स्टोरी शेअर करत लिहिलं, “मी स्वतःबद्दल बोलत होते गं… मी अशी दिसते… तू माझ्यासाठी गिफ्ट आणलीस त्याबद्दल धन्यवाद.” त्या दोघींचं हे संभाषण पाहून चाहत्यांनादेखील हसू आवरलं नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mrunmayee deshpande respond to a meme shared by her sister gautami deshpande rnv

First published on: 25-05-2023 at 19:11 IST
Next Story
Video : ‘खतरों के खिलाडी’च्या शूटींगला सुरुवात, रोहित शेट्टी येताच शिव ठाकरेने केलं असं काही….