अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. अनेक चित्रपटांमधून मृण्मयीने वेगवेगळ्या धाटणीच्या भुमिका साकारल्या आहेत. मृणमयीचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर मृणमयी मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान मृण्मयीची नवी पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

५७वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी दिग्गज मराठी अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच चित्रपट क्षेत्राशी संबंधित अनेक कलाकारांना निरनिराळ्या पुरस्काराने गौरवण्यात आले. मृण्मयी देशापांडेच्या ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटाला कै.स्मिता पाटील पुरस्कार’ मिळाला. या पुरस्कारानिमित्त मृण्मयीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

मृण्मयीने आपल्या इन्स्टाग्रामवर पुरस्काराचे स्मृतीचिन्हाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले. “काल आमच्या ‘miss you mister’ या फिल्म साठी महाराष्ट्र शासनाचा ( state award) – ‘कै.स्मिता पाटील पुरस्कार’( best actress in film category) मिळाला… समीर जोशी @sameerhemantjoshiofficial याचं सगळं श्रेय तुला जातं…(दिग्दर्शनाचं द्वितीय पारितोषिक मिळालं त्या बद्दल पण खूप प्रेम आणि अभिनंदन ) अजूनही ही फिल्म कुठे बघता येईल असे messgaes सतत येतात… @deepatracy तुमचे सुद्धा मनापासून आभार … काल सोहोळ्याला हजेरी नाही लावता आली त्यामुळे miss you all म्हणावं लागत आहे. पण आता लवकर भेटूया.” मृण्यची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

मृण्मयी सध्या आहे कुठे?

मृण्यमयी देशपांडे सध्या तिच्या नवरा स्वप्नील रावबरोबर केरळ ट्रीपवर आहे. अभिनेत्रीने या ट्रीपदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मृण्मयी व स्वप्नील सध्या केरळमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

हेही वाचा- भगरे गुरुजींच्या लेकीनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीने तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचं केलं केळवण, फोटो शेअर करत म्हणाली…

मृण्मयीच्या कामाबबत बोलायचे झाल्यास, नाटक, चित्रपट, मालिका, वेबसिरीजमधून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. सुभेदार चित्रपटात मृण्मयीने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर मृणमयी ‘मुंबई डायरीज’ वेबसिरीजच्या दुसऱ्या भागात झळकली होती. ६ ऑक्टोबर २०२३ ला ही वेबसिरीज अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित कऱण्यात आली होती. २६/११ च्या हल्ल्याच्या दिवशी डॉक्टर कोणत्या परिस्थितीत होते याचे उत्कृष्ट रित्या वर्णन दिग्दर्शक निखिल आडवाणीने या सीरिजमध्ये केले आहे. या सीरिजमध्ये मृण्मयी देशपांडेबरोबर मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा, श्रेया धन्वंतरी, सत्याजीत दुबे आणि नताशा भारद्वाज प्रमुख भूमिकेत झळकले आहेत.