Mugdha Godbole Emotional Post for Daughter: मुग्धा गोडबोले यांनी विविध मालिका, सिनेमांत काम करीत मनोरंजन क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या त्या पॉडकास्टच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्याबरोबरच त्या लेखिका म्हणूनही काम करतात.

आता मुग्धा गोडबोले चर्चेत आल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या मुलीबद्दल लिहिले आहे. मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खास फोटो शेअर केले आणि भावना व्यक्त केल्या.

“माझी मुलगी आज २० वर्षांची…”

त्यांनी लिहिले, “मी जेव्हा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, ते तिला आवडत नाही. पण, आज तो नियम मोडण्याची मी स्वत:ला परवानगी दिली. आज मी थोडी भावूकही झाली आहे.”

पुढे त्यांनी लिहिले, “माझी मुलगी आज २० वर्षांची झाली आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतो, इतकंच मला सांगायचं आहे. जिथे नम्रपणा गरजेचा आहे, तिथे नम्र राहा. जिथे खंबीर होण्याची गरज आहे, तिथे खंबीर हो. गरज असेल तेव्हा स्वतःचं संरक्षण कर, शक्य असेल तेव्हा इतरांची काळजी घे. तुझ्या आयुष्यातील माणसं विचारपूर्वक निवड. प्राण्यांशी नेहमी दयाळूपणे वाग आणि प्लीज आज सकाळी आपला फोटो न काढण्याचा नियम मी मोडला म्हणून दिवसभर माझ्यावर रागावू नकोस.”

शेवटी त्यांनी असेही लिहिले, “माझ्या आयुष्यात माझ्याबरोबर घडलेली सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे तू आहेस, हे लक्षात ठेव. २०व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शब्दांत व्यक्त करता येईल त्यापेक्षाही कितीतरी जास्त माझं तुझ्यावर प्रेम आहे. मम्मा आणि बाबा कायम तुझ्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे.” मुग्धा गोडबोलेंच्या या पोस्टवर मुलगी ऋचाने कमेंट करीत, “लव्ह यू मम्मा”, असे लिहिले आहे.

मुग्धा गोडबोलेंनी ऋचा अगदी लहान असतानाचे तसेच, मोठ्यापणीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत ऋचाला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, मुग्धा गोडबोले सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या व्हिडीओ, फोटो शेअर करीत असतात. त्या विविध पदार्थांच्या रेसिपीदेखील शेअर करतात. चाहतेही कमेंट करीत त्यांना प्रतिसाद देतात.