Mugdha Godbole Kokan Visit: मुग्धा गोडबोले अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहेत. याबरोबरच, त्या लेखिका म्हणूनही लोकप्रिय आहेत. विविध मालिकांचे त्या लिखाण करत असतात. अनेक कलाकार काही वेळा त्याबद्दल बोलताना दिसतात.

मुग्धा गोडबोले सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. विविध पोस्ट, व्हिडीओ त्या शेअर करतात. काही वेळा त्या त्यांना आलेले अनुभव सांगतात. तर काही वेळा काही पदार्थांच्या रेसिपी शेअर करतात.

‘सनई चौघडे’च्या शूटिंगच्या निमित्ताने मुग्धा गोडबोलेंची कोकण ट्रिप

आता मुग्धा गोडबोले यांनी काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी कोकणात फिरायला गेल्याचे सांगितले आहे. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, “‘सनई चौघडे’ मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने अगदी धावती पण कोकणात फेरी झाली. नजर जाईल तिथे सुंदर हिरवाकंच रंग डोळ्यांना शांत आणि तृप्त करून गेला.”

पुढे त्यांनी लिहिले, “गणपती येणार या उत्साहात सगळं कणकवली आणि असरोंडी गाव होतं. पाचलमधली बाजारपेठ भरली होती. राखीपौर्णिमा आली होती, त्यामुळे सुंदर पूर्णचंद्र दिसत होता. हे सगळं पाहणं म्हणजे सुख आहे. अनुस्कुरा घाटातून जाताना अप्रतिम रस्ता, डोळ्याचं पारणं फिटेल असा निसर्ग आहे.”

मुग्धा गोडबोलेंनी शेवटी लिहिले, “कामानिमित्त फिरायला मिळतं, महाराष्ट्र बघायला मिळतो याहून मोठं भाग्य नाही”, असे लिहित त्यांनी कोकणचे वर्णन केले. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओत हिरवागार निसर्ग, धबधबा पाहायला मिळत आहे. त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी काही कमेंट्सही केल्या आहेत.

एकाने लिहिले, “सनई चौघडेचं लिखाण सुंदर आहे. म्हणूनच ही ब्लॉकबस्टर मालिका आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “तुम्ही वीण दोघांतली ही तुटेना मालिकेसाठी जे डायलॉग लिहिले आहेत, ते मला खूप आवडतात.” एकाने लिहिले, “सुंदर”, आणखी एकाने लिहिले, “वाह! मस्त”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मुग्धा गोडबोले काही दिवसांपूर्वी तुला जपणार आहे या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. आता आगामी काळात त्या कोणत्या भूमिकेत दिसणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.