‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे घराघरांत लोकप्रिय झाले. हा कार्यक्रम संपल्यावर दोघांमध्ये छान मैत्री झाली अन् पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रेक्षकांच्या या आवडत्या जोडीने गेल्यावर्षी ( २०२३ ) डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली. मुग्धा आणि प्रथमेश आपल्या सुमधूर आवाजाने नेहमीच चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असतात. या जोडप्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हे दोघं सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असतात. त्यांच्या गाण्यांचे कार्यक्रम विविध ठिकाणी होत असतात.

मुग्धा आणि प्रथमेश लग्नानंतर आता जवळपास पाच महिन्यांनी फिरायला नेपाळ दौऱ्यावर गेले आहेत. व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून ही जोडी सध्या नेपाळमध्ये धमाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. याबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मुग्धा-प्रथमेशने माहिती दिली आहे.

हेही वाचा : शिवानी सुर्वेच्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नव्या मालिकेत झळकणार ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेता, साकारणार ‘ही’ भूमिका

गेले काही दिवस मुग्धा-प्रथमेश नेपाळमधील निसर्गरम्य ठिकाणांचे फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर करत आहेत. अशातच नुकतंच त्यांनी नेपाळमधील पशुपती नाथाच्या मंदिरात जोडीने दर्शन घेऊन भगवान शिवशंकराचा आशीर्वाद घेतला. हे मंदिर अतिशय पवित्र स्थळ मानलं जातं. जगभरातून लाखो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. नेपाळमधील काठमांडू येथे हे मंदिर आहे. या मंदिरात देवदर्शन केल्यावर या जोडप्याने नेपाळी पदार्थांचा आस्वाद घेतला.

हेही वाचा : “झोपेत असताना गोळीबाराचा आवाज आला अन्…”, सलमान खानने पहिल्यांदाच पोलिसांना सांगितला ‘त्या’ दिवशीचा घटनाक्रम

मुग्धाने नेपाळी पदार्थांचा फोटो शेअर करत त्यावर “फूड फॉर Soul डाएट वगैरे सगळं भारतातंच ठेऊन इकडे आलो” असं कॅप्शन दिलं आहे. दोघांच्याही ताटात पारंपरिक नेपाळी पदार्थ असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय या दोघांनी नेपाळच्या चितवन नॅशनल पार्कमध्ये प्राणी सफारीचा आनंद घेतला. दोघांनाही हत्ती, हरिण, मगर, काळवीट या वन्य प्राण्यांचं चितवनच्या राष्ट्रीय उद्यानात दर्शन झालं.

हेही वाचा : ठरलं तर मग : साक्षी करणार अर्जुन अन् चैतन्यची कोंडी! दोघांवर केले गंभीर आरोप, मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

मुग्धा वैशंपायनची इन्स्टाग्राम स्टोरी

मुग्धा-प्रथमेशने आतापर्यंत नेपाळमधील मनाकामना, पोखरा, फेवा लेक, महादेव केव्ह, गुप्तेश्वर, फिश्तैल अशा बऱ्याच ठिकाणी भ्रमंती केली आहे. दरम्यान, या दोघांनी गेल्यावर्षी २१ डिसेंबरला लग्न केलं. मराठमोळ्या परंपरेनुसार आणि पारंपरिक पद्धतीत या दोघांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. यांच्या लग्नाला कलाविश्वातील बरेच लोक उपस्थित होते.