आपल्या सुमधूर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी आणि ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड हिच्या घरी लवकरच पाळणार हलणार आहे. कार्तिक एका गोंडस बाळा जन्म देऊन आई होणार आहे. नुकताच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

काल, २९ मार्चला कार्तिकी गायकवाडने डोहाळे जेवणातील खास क्षणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. “ओटीभरण कार्यक्रमातील आनंदाचे क्षण,” असं कॅप्शन लिहित तिने बरेच फोटो, व्हिडीओ शेअर केले. सध्या सोशल मीडियावर हे फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहेत. कार्तिकीने दिलेली आनंदाची बातमी वाचून मुग्धा वैशंपायन भावुक झाली आणि काय म्हणाली? जाणून घ्या…

हेही वाचा – “लग्न कधी करतोय?”,’टाइमपास’ फेम अभिनेत्यानं चाहत्याच्या प्रश्नाला दिलं उत्तर, म्हणाला, “लग्न आणि…”

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वात कार्तिकी व मुग्धा होत्या. या कार्यक्रमातील पंचरत्नमध्ये दोघींचाही सहभाग होता. त्यामुळे दोघी चांगल्या मैत्रीणी आहेत. कार्तिकीने ओटभरणीची पोस्ट करताच मुग्धाने त्यावर प्रतिक्रिया दिली. मुग्धाने हार्ट आणि रडण्याचे इमोजी टाकत पुढे लिहिलं, “कार्तिकी मी खूप खूप आनंदी आहे.” मुग्धाची ही प्रतिक्रिया वाचून कार्तिकीने तिचे आभार मानले.

मुग्धाशिवाय इतर कलाकारामंडळींनी देखील कार्तिकीला शुभेच्छा दिल्या. प्रियांका बर्वे, स्पृहा जोशी, भार्गवी चिरमुले, प्राजक्ता गायकवाड, शरयू दाते, मेघना एरंडे अशा अनेक कलाकारांसह चाहत्यांनी कार्तिकीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

हेही वाचा – रामानंद सागर यांच्या ‘श्री कृष्ण’ मालिकेतील चिमुकल्याला ओळखलंत का? मराठी मालिकेत अभिनेता, लेखक म्हणून केलंय काम

दरम्यान, कार्तिकी गायकवाडने २०२०मध्ये रोनित पिसे याच्याशी लग्नगाठ बांधली होती. पुण्यात पारंपरिक पद्धतीने कार्तिकी-रोनितचा लग्नसोहळा झाला होता. आता लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी-रोनित आई-बाबा होणार आहेत. सध्या कार्तिकीला सातवा महिना असून मे महिन्यात ती एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे.