मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय गायिका म्हणून मुग्धा वैशंपायनला ओळखले जाते. सा रे ग म प लिटिल चॅम्पसमधून मुग्धा घराघऱांत पोहचली. गेल्यावर्षी २१ डिसेंबरला मुग्धाने गायक प्रथमेश लघाटेबरोबर लग्नगाठ बांधली. चिपळूणमध्ये दोघांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

मुग्धाच्या लग्नाच्या काही दिवस अगोदरच तिची मोठी बहीण मृदुल वैशंपायन लग्नबंधनात अडकली. मृदुलने विश्वजीत जोगळेकरबरोबर लग्नगाठ बांधली आहे. मृदलच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आज मृदलच्या नवऱ्याचा म्हणजे विश्वजीतचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मुग्धाने तिच्या लाडक्या भावजींना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा- तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला ‘बिग बॉस १७’मधील लोकप्रिय जोडीची हजेरी, फोटो शेअर करत दिल्या मराठीतून शुभेच्छा, म्हणाले, “एक स्वप्न…”

सोशल मीडियावर मुग्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. भावजीं विश्वजीतच्या वाढदिवसानिमित्त मुग्धाने इन्स्टाग्राम स्टोरीवर विश्वजीतबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले “वाढदिवसाच्या शुभेच्छा जीज”. मुग्धाने ही पोस्ट विश्वजीतला टॅगही केली आहे. फोटोवरुन मुग्धा व विश्वजीतमध्ये चांगले बॉन्डिंग असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान लग्नानंतर मुग्धा व प्रथमेशने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा डोंबिवलीत ‘स्वरपौर्णिमा’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला श्रोत्यांनी भरघोस प्रतिसाद देत कार्यक्रम हाऊसफुल केला. मुग्धा व प्रथमेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदची बातमी सांगितली होती.