६०- ७० च्या दशकात मुमताज यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हिंदी चित्रटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या मुमताज यांच्या सौंदर्यावर तर अनेकजण भाळले होते. नाकीडोळी सुंदर, रेखीव आणि त्या काळी अनेकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या या अभिनेत्रीचा जन्म एका मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबात झाला होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे वयाच्या १२ व्या वर्षी मुमताज यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं.

सोनाक्षी सिन्हा हुबेहुब तुमच्यासारखी का दिसते? यावर रीना रॉय यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…

ravi rana bachchu kadu
“आम्ही तुमच्या खासगी गोष्टी बाहेर काढल्या तर…”, बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटाने मुमताज यांच्या कारकिर्दीला कलाटणी दिली. चित्रपटसृष्टीत नावारुपास येत असतानाच त्यांचं नाव संजय खान, फिरोज खान, देव आनंद आणि शम्मी कपूर या कलाकारांशी जोडलं गेलं होतं. यापैकी दिवंगत अभिनेते शम्मी कपूरशी असलेल्या त्यांच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. पण, या दोघांचं लग्न होऊ शकलं नव्हतं. अलीकडेच मुमताज व धर्मेंद्र यांनी ‘इंडियन आयडन १३’ मध्ये हजेरी लावली. यावेळी मुमताज यांनी शम्मी कपूर यांच्याशी लग्न का केलं नाही, याबद्दल खुलासा केला.

“…तर मी तुला मारून टाकेन” रीना रॉय यांनी शत्रुघ्न सिन्हांना दिलेली धमकी

त्या काळी शम्मी कपूर यांनी लग्नाची विचारणा केल्याची आठवण यावेळी मुमताज यांनी सांगितली. “शम्मी कपूर यांनी मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, असं थेट म्हटलं होतं. मी त्यावेळी १७ वर्षांची होते आणि मला लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे मी लग्नास नकार दिला होता. पण मला अजूनही त्यांची आठवण येते,” असं मुमताज यांनी सांगितलं.

दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांचं लग्न न होण्यामागचं आणखी एक कारण होतं. मुमताज यांचंही शम्मी कपूर यांच्यावर प्रेम होतं. पण, लग्नानंतर चित्रपटसृष्टीतील करिअर सोडून कुटुंबाला प्राधान्य द्यावं अशी शम्मी कपूर यांची अपेक्षा होती. पण, या एका अटीमुळे त्यांच्या प्रेमाचा गाडा पुढे जाऊ शकला नाही. शम्मीजींच्या लग्नाच्या प्रस्तावाला मुमताज यांनी नकार दिला आणि त्यांच्या नात्याला पूर्णविराम लागला, असं म्हटलं जातं.

“ती अतिशय…” शम्मी कपूर यांची एक अट अन् मुमताज यांनी संपवलं होतं नातं

मुमताज यांनी १९७४ मध्ये मयूर माधवानी यांच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीतूनही काढता पाय घेतला आणि त्या लंडनला स्थायिक झाल्या होत्या.