स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी व अभिनेत्री हिना खान सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नुकतेच त्यांचे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. काही दिवसांपूर्वी या गाण्याचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. तेव्हापासून चाहत्यांच्या मनात या गाण्याबद्दल उत्सुक्ता वाढली होती. आता अखेरीस हे गाणे प्रदर्शित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हल्की हल्की सी’ असे या गाण्याचे बोल आहेत. ४.५९ मिनिटांच्या या गाण्यात मुनव्वर व हिना खानची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. मुनव्वर आणि हिना खान यांनी हे गाणे कोलकातामध्ये शूट केले आहे. गाण्याची थीम बंगाली मुलगी आणि मुलाची प्रेमकथेवर आधारीत आहे. या गाण्याची सुरुवात मुनव्वर आणि हिनाच्या लहानपणापासून झालेली दिसते. दोघेही लहानपणीच विभक्त होतात आणि नंतर मोठे झाल्यावर पुन्हा एकदा भेटतात. या गाण्यात हिना आणि मुनव्वर दोघांची जबरदस्त क्रेमिस्ट्री बघायला मिळत आहे.

प्रेक्षकांकडून या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी काहींना मुनव्वर व हिनाची जोडी आवडलेली दिसून येत नाही. अनेकांनी या गाण्यातील लूकवरुन दोघांना ट्रोल केले आहे. एकाने कमेंट करत लिहिले “मुनव्वर रामू काकांचा मुलगा वाटतं आहे तर हिना खान त्याच्या आईसारखी दिसत आहे.” तर दुसऱ्याने “मुनव्वरचा अभिनय बघून अर्जून कपूरबद्दलचा माझा आदर वाढला आहे”, अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा- मृण्मयी देशपांडेच्या ‘या’ चित्रपटाला मिळाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, पोस्ट करत म्हणाली…

‘हल्की हल्की सी’ या गाण्याला असिस कौर आणि साज भट्ट यांचा आवाज लाभला आहे. संजीव चतुर्वेदी यांनी हे गाणे लिहिले आहे. याआधी २०२२ मध्ये मुनव्वरचे रोमँटिक गाणे ‘हलकी सी बरसात’ रिलीज झाले होते. ज्यामध्ये तो त्याची प्रेयसी नाझिलाबरोबर दिसला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Munawar faruqui and hina khan romantic song halki halki si release dpj
First published on: 23-02-2024 at 19:45 IST