Namrata Sambherao shares special post: कलाकार जितके त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात, तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील अनेकदा चर्चेत येतात. आपल्या आवडत्या कलाकारांचे लग्न कोणाबरोबर झाले आहे, त्यांना मुले आहेत का, ती मुले कितव्या इयत्तेत आहेत, त्यांना पुढे अभिनय क्षेत्रातच काम करायचे आहे का, तसेच, त्यांच्या जोडीदाराबद्दल, त्यांच्या घराबद्दल आणि त्यांच्याशी संबंधित अनेकविध गोष्टींबद्दल चाहत्यांना जाणून घ्यायचे असते.
कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असतात. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टी शेअर करत असतात. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अनेकदा काही गोष्टी शेअर करत भावनाही व्यक्त करतात.
आता अभिनेत्री नम्रता संभेरावने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. नम्रताने तिच्या पतीबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिने हे फोटो शेअर केले असून अभिनेत्रीने तिच्या भावानाही व्यक्त केल्या आहेत.
“आपल्या आयुष्यातील सर्वात…”
नम्रताने लिहिले, “अहो संभेराव लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.” पुढे तिने लग्नाला १३ वर्षे पूर्ण झाल्याचे सांगत लिहित, “१३ मे १३ वर्ष १३ (तेरा) साथ. २०१३ मधलाच आपला पहिला सेल्फी अजूनही जपून ठेवला आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात खास दिवस आहे.”
पुढे तिने लिहिले, “आपली मैत्री, प्रेम, आपलं चेहऱ्यावरचं हसू कायम असंच निखळ राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. योगी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला रुद्राज हे इतकं गोड बाळ दिल्याबज्जस मी आयुष्यभर ऋणी आहे. मी खूप आनंदी आहे.”
नम्रताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एकाने लिहिले, “अशीच क्षणा क्षणाला,तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो, शुभ लग्नाचा हा वाढदिवस,सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”, दुसऱ्या एकाने लिहिले, “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”, आणखी एकाने लिहिले, “नम्रता तू १३ वर्षांपूर्वी दिसायचीस, तशीच आताही कशी दिसतेस”, एकाने लिहिले, “वाह! काय जोडी आहे. तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”, अशा अनेक कमेंट्स करत चाहते नम्रता व तिचा पती योगेश संभेराव यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.



दरम्यान, नम्रताला महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये ती ज्या पद्धतीने वेगवेगळी पात्रे साकारते आणि प्रेक्षकांना खळखळून हसवते, त्यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. याबरोबरच,ती नाटक, चित्रपट या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येते.
