आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजेच नम्रता संभेराव. ‘फू बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांमुळे नम्रता घराघरांत पोहोचली. नुकताच नम्रता प्रमुख भूमिकेत असलेला ‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं ‘नाच गं घुमा’ टीमनं खूप चांगलं प्रमोशन केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसादही मिळत आहे.

नम्रताच्या अनेक कलाकार मित्र-मैत्रिणींनी तिला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. नम्रताचा जवळचा मित्र प्रसाद खांडेकरनंदेखील चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी तिला शुभेच्छा देण्यासाठी एक खास पत्र लिहिलं होतं. त्याची पोस्ट तिनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केली होती. नम्रता आणि प्रसाद यांची मैत्री खूप जुनी आहे. दोघांनी एका नाटकासाठी एकत्र कामदेखील केलं आहे.

Territorial Battles Lead to t9 Tiger Deaths in Nagzira Reserve
विश्लेषण : वर्चस्वाची लढाई नागझिऱ्यातील वाघांसाठी धोकादायक?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Pimpri-Chinchwad, old woman raped Pimpri-Chinchwad,
पिंपरी-चिंचवड: ८५ वर्षीय ज्येष्ठ महिलेवर २३ वर्षीय तरुणाने केला बलात्कार; आरोपी अटक
After 75 years of independence ST bus started for the first time in Naxal-affected Gardewada
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर नक्षलग्रस्त गर्देवाडात ‘लालपरी’ अवतरली; गावात पहिल्यांदाच…
nagpur ambazari lake overflowed flood situation completes one year
नागपूरच्या महापुराची वर्षपूर्ती! भय इथले संपत नाही…
achieving life goals steps to be successful in life
सांधा बदलताना: तो प्रवास सुंदर होता
cyber crime
Nagpur Crime News : सायबर चोरट्यांनी ६० लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्यानंतर ५१ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
Shukra Gochar 2024 malavya yog
१० दिवसांनंतर मिळणार नुसता पैसा; ‘मालव्य राजयोग’ देणार ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रतिष्ठा

नम्रता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अनेकदा ती वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करीत असते. आज तिच्या खास मित्राचा म्हणजेच प्रसाद खांडेकरचा वाढदिवस आहे. त्यासाठी तिनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये १० वर्षांपूर्वींचा म्हणजेच २०१३ रोजी काढलेला प्रसाद आणि नम्रताचा फोटो आहे; तर बाजूला २०२४ मध्ये काढलेला दोघांचा फोटो आहे.

हेही वाचा… संस्कृती बालगुडे आहे ‘या’ अभिनेत्याची फॅन; दोघंही लवकरच झळकणार एका चित्रपटात, अभिनेत्री म्हणाली, “…आणि शेवटी ते झालंय”

मैत्रीच्या या सुंदर प्रवासासाठी आणि अर्थात वाढदिवसासाठी नम्रतानं या फोटोला कॅप्शन देत लिहिलं, “१० वर्षांच्या मैत्रीसाठी अभिनंदन! पश्या, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तू खूप प्रतिभावान आहेस. तू मल्टीटास्कर आहेस. तू एक सर्वोत्कृष्ट मुलगा, सर्वोत्कृष्ट मित्र आहेस. सकारात्मकता तुझ्यात ठासून भरली आहे. खूप प्रेम पश्या! खूप मोठा हो, यशाची शिखरं गाठ. तुझ्या उत्तमोत्तम प्रोजेक्ट्सची रांग लागू दे. सिनेमे, नाटकं सगळंच खूप गाजू दे. त्या सगळ्यात मी नेहमीच असेन. कारण- माझ्या आयुष्यातल्या पहिल्या बक्षिसाची सुरुवात तू लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘कुर्रर्रर्र’ या नाटकापासून झाली आणि आत्मविश्वास द्विगुणीत झाला. सगळ्यासाठी खूप खूप धन्यवाद! काळजी घे. आज हास्यदिन आहे किती सुंदर योगायोग.”

हेही वाचा… “आता शोभतोयस खरा फिल्टरपाड्याचा बच्चन”, गौरव मोरेचा नवा लूक पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, नम्रता संभेरावचा चित्रपट ‘नाच गं घुमा’ १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात नम्रता संभेराव व मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकांत आहेत. तसेच सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मायरा वायकुळ, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, सुनील अभ्यंकर यांच्याही निर्णायक भूमिका या चित्रपटात आहेत.