Nandita Patkar Wedding : मराठी मालिका व चित्रपटांत काम करत आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नंदिता पाटकर. नंदिता सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. नंदिताने एक गुड न्यूज दिली आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
नंदिता पाटकरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तिने विपूल महागावकर यांच्याशी लग्न केलं आहे. नंदिताच्या अकाउंटवरही विपूल यांच्याबरोबरचे फोटो आहेत. पण, विपूल कोण आहेत, कोणत्या क्षेत्रात काम करतात आणि या दोघांनी कधी लग्न केलं याबद्दल जाणून घेऊयात…
साक्षी गांधीने शेअर केला फोटो
नंदिता ‘स्टार प्रवाह’वरील ‘सहकुटुंब सहपरिपार’ या मालिकेतून घराघरात पोहचोली. यामुळे ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. याच मालिकेतील तिची सहअभिनेत्री साक्षी गांधीने इन्स्टाग्रामवर नंदिताच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी तिने या नवविवाहित जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. साक्षीने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत त्यामधून नंदिता व विपूल यांच्या लग्नाचा फोटो शेअर करत त्याला “तायडे खूप खूप शुभेच्छा. तुझ्यासाठी मी खूप आनंदी आहे. लव्ह यू” असं म्हटलं आहे.
नंदिता व विपूल यांच्या लग्नातील लूकबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी साध्या व पारंपरिक पद्धतीने लग्न केल्याचं समोर आलेल्या फोटोमधून दिसतं. लग्नासाठी दोघांनी एकाच रंगाचे कपडे परिधान केले आहेत. यावेळी नंदिताने सोनेरी रंगाची साडी नेसली असून त्यावर सिंपल मेकअप केला आहे. यावेळी तिने हातात हिरवा चुडा, गळ्यात हार आणि मंगळसूत्र तसेच नाकात नथ परिधान केल्याचं दिसतं. तर विपूल यांनीसुद्धा लग्नासाठी साधा आणि सिंपल लूक केला आहे. त्यांनीसुद्धा सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केल्याचं दिसतं.
कोणत्या क्षेत्रात काम करतात नंदिताचे पती
नंदिताच्या पतीबद्दल बोलायचं झालं तर तिचे पती विपूल महागावकर रंगभूमीवरील दिग्दर्शक असल्याचं त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरील बायोमध्ये लहिलं आहे. त्यांच्या अकाउंटवर नंदिताच्या नाटकांचे व्हिडीओ व फोटोसुद्धा पाहायला मिळत आहेत. तसेच दोघांचे एकत्रित फोटोसुद्धा पोस्ट केलेले आहेत.

नंदिताचं हे दुसरं लग्न असून नंदिताने काही वर्षांपू्र्वी तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. ती अनेकदा मुलाखतींमधून तिच्या घटस्फोटाबद्दल आणि त्यानंतरच्या संघर्षाबद्दलही बोलली आहे. अनेक वर्षे इंडस्ट्रीत काम करत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर नंदितानं दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आता ती नुकतीच विवाहबंधनात अडकली.
दरम्यान, नंदिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांच्याबरोबर ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकात काम करत आहे. तिने आतापर्यंत चित्रपट व मालिकांसह नाटकांतही काम केलं आहे.
