Navari Mile Hitlerla : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एजे व लीलाचं लग्न झाल्यापासून काहींना काहीतरी घडताना दिसत आहे. लग्नानंतरही एजे (अभिराम जहागीरदार) व लीलामधील गैरसमज, वाद अजूनही कायम आहेत. अशातच लग्नानंतरची लीलाची पहिली मंगळागौर होणार आहे. लीलाच्या पहिल्या मंगळागौर कार्यक्रमाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये लीला भन्नाट उखाणा घेताना दिसत आहे.

लीलाने मंगळगौर कार्यक्रमासाठी खास पारंपरिक लूक केला आहे. गुलाबी किनार व अबोली रंगाच्या नऊवारी साडीत लीला पाहायला मिळत आहेत. तिने भरजरी असे दागिने घातले आहेत. या पारंपरिक लूकमध्ये लीला खूपच सुंदर दिसत आहे. मंगळागौर कार्यक्रमात लीला भन्नाट उखाण्याच्या माध्यमातून आजीला वचन देताना पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – Video: युरोपहून एका महिन्याची सुट्टी एन्जॉय करून परतले पतौडी कुटुंब, धाकट्या लेकाबरोबर मस्ती करताना दिसला सैफ अली खान

Navari Mile Hitlerla (Photo Credit – Zee Marathi)

लीलाचा भन्नाट उखाणा ऐका

‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navari Mile Hitlerla ) मालिकेच्या पेजवर मंगळगौर कार्यक्रमाचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सर्व महिला मंगळगौर खेळताना दिसत आहेत. यावेळी लीला सगळ्यांसमोर उखाणा घेते की, माझ्या लग्नाबद्दल सगळे काय ते हवं ते बोला…पण हेच सत्य आहे की, मी घातलीये एजेंच्या गळ्यात वरमाळा…कोणाला आवडू दे किंवा न आवडू दे…देवा मला हा संसार पेलवण्याची शक्ती दे…आजी एजेंचं नाव घेऊन वचन देते मी तुम्हाला…तुमच्या प्रेमाचा मान ठेवेन ही लीला. लीलाचा हा उखाणा सगळ्या महिलांबरोबरच मागून एजे देखील ऐकताना दिसत आहे.

हेही वाचा – इंग्रजी भाषा, ब्रशवाला माइक अन् रिमा लागूंना पाहिल्यानंतरची प्रतिक्रिया, मधुराणी प्रभुलकरने सांगितले ‘नवरा माझा नवसाचा’मधील किस्से

दरम्यान, १८ मार्चपासून सुरू झालेली ‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navari Mile Hitlerla ) मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील एजे व लीलाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तसंच मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. त्यामुळे ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेला टीआरपी देखील चांगला मिळत आहे.