'नवरी मिळे हिटलरला' (Navri Mile Hitlarla) ही मालिका आपल्या नवनवीन ट्विस्टमुळे सतत चर्चेत असते. वेगळे कथानक आणि कलाकारांचा सहज अभिनय यांमुळे या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मालिकेतील एजे आणि लीला ही पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहेत. आता 'झी मराठी' वाहिनीने मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. 'झी मराठी' वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये लीला आणि एजे यांची लव्ह स्टोरी सुरू होणार, असे म्हटले आहे. सुरू होणार एजे आणि लीलाची लव्ह स्टोरी प्रोमोमध्ये दाखविल्याप्रमाणे एजे आणि लीला यांच्यात कोण कुठे झोपणार, यावरून भांडण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एजे लीलाला म्हणतो, "तुला आरामाची गरज आहे. तू बेडवर जाऊन झोप. मी सोफ्यावर झोपतो." त्यावर लीला हातातील पांघरूण एजेकडे फेकत "तुम्ही जाऊन झोपा", असे ओरडत म्हणते. त्यावर एजे तिला, "ही बोलायची काय पद्धत आहे", असे विचारतो. https://www.instagram.com/reel/C-o1aDkNKkH/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== झी मराठी इन्स्टाग्राम एजेला उत्तर देताना लीला म्हणते, "सगळं सिद्ध झालंय की, मी खरं बोलत होते. तुम्हाला साधं सॉरी बोलावंसं वाटत नाही." एजे तिला म्हणतो, "मी अंतराचा खून केला, असा घाणेरडा आरोप तू माझ्यावर लावत होतीस." लीला म्हणते, "पण तुमचंही चुकलं आहे. त्यामुळे आधी तुम्ही सॉरी बोला; मग मी म्हणते." एजे म्हणतो की, तू आधी मला सॉरी म्हण. त्यावर लीला त्याला, "विसरा", असं म्हणत तिथून झोपायला जाते. हा प्रोमो शेअर करताना, झी मराठी वाहिनीने, सुरू होणार इम्परफेक्ट स्टोरीची परफेक्ट लव्ह स्टोरी!, अशी कॅप्शन दिली आहे. हेही वाचा: “५ महिन्यांपूर्वी बाबा होतास, आता कोण झालास!” विकी कौशलला सॅम मानेकशॉ यांच्या मुलीने केला मेसेज; अभिनेता म्हणाला… मालिकेत दाखविल्याप्रमाणे, विक्रांतने लीला आणि त्याच्या बायकोला किडनॅप करून मारण्याचा प्लॅन बनवला होता. त्याबरोबरच तो यावेळी कबूलही करतो की, लीलाच्या बहिणीला किडनॅप करून एजेबरोबर लग्न करण्यासाठी सांगणारा मास्क घातलेला माणूस मीच आहे. विक्रांतने लीलाला एका बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगमध्ये बोलावून मारण्याची तयारी केलेली असते. त्या दोघींच्या आजूबाजूला तो रॉकेल ओततो आणि काडी पेटवतो. तेवढ्यात एजेची एन्ट्री होते आणि तो लीला व विक्रांतच्या बायकोला वाचवतो. त्यावेळी संपूर्ण सत्य त्यांच्यासमोर येते. आता या प्रोमोनंतर मालिकेत कोणते वळण येणार, मालिकेतील कोणती समीकरणे बदलणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे चित्र आहे. त्याबरोबरच एजे आणि लीलाची लव्ह स्टोरी पाहण्यासाठीदेखील चाहते उत्सुक असल्याचे दिसत आहे.