Sanika Kashikar Shares Emotional Video: वल्लरी विराज व राकेश बापट यांच्या प्रमुख भूमिका असलेली नवरी मिळे हिटलरला ही मालिका खूप लोकप्रिय झाली. मात्र, या मालिकेतील फक्त या दोनच कलाकारांनी नाही, तर सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

आता मालिकेत लक्ष्मी ही भूमिका साकारणार्‍या अभिनेत्री सानिका काशिकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये वल्लरी विराज, भूमिजा पाटील, शर्मिला शिंदे, तसेच सेटवरील इतर कलाकार त्यामध्ये दिसत आहेत.

मी रोज हे मनाला पटवून…

हा व्हिडीओ शेअर करताना सानिका काशिकरने चाहत्यांना उद्देशून लिहिले, “मला सगळ्यांची माफी मागायची आहे. कारण- मी सोशल मीडियावर १४ तारखेपासून व्हिडीओ पोस्ट केले नाहीत. खरं सांगायचं तर, ते व्हिडीओ पाहण्याची हिंमत होत नाहीये. हे सगळं खरं आहे, याची अजूनही खात्री होत नाहीये. मी रोज हे मनाला पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्ही तयार नसला तरी आयुष्य पुढे सरकत जातं.”

पुढे अभिनेत्रीने तिला मालिकेत काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच ज्या पद्धतीने पाठिंबा व प्रेम मिळाले, ते शब्दांत मांडू शकत नसल्याचे अभिनेत्रीने लिहिले आहे. त्यामध्ये झी मराठी, शर्मिष्ठा राऊत, चंद्रकांत गायकवाड तसेच इतर काही जणांना तिने टॅग केले आहे.

सानिका काशिकरच्या या पोस्टवर अनेक कलाकार, तसेच चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. वल्लरी विराज, भूमिजा पाटील, शर्मिला शिंदे अशा अनेक कलाकारांनी भावूक झाल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. तसेच सानिकाची पोस्ट पाहिल्यानंतर चाहतेदेखील भावूक झाले आहेत. एका चाहत्याने लिहिले, “असेच तुम्ही सगळे पुन्हा एकत्र या”, दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “आम्हाला तुमची आठवण येईल”, आणखी एका चाहत्याने लिहिले, “वर्षभर तुम्हाला पाहिलं आहे. मालिका संपत आहे, ही कल्पनाच करू शकत नाही.”

“जहागीरदार कुटुंबाची खूप आठवण येईल”, “हा भावूक करणारा व्हिडीओ आहे. आम्हाला तुमची खूप आठवण येईल”, “कॅप्शन वाचूनच रडलो”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मालिकेत लक्ष्मी ही भूमिका नकारात्मक आहे. लक्ष्मी लीलाला घरातून बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसली. तसेच सरू व लक्ष्मीची जोडीदेखील प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. आता मालिकेचे शूटिंग संपले आहे. आता हे कलाकार पुढे कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.