कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्याविरोधात एनसीबीकडून २०० पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. दोन वर्ष जुन्या ड्रग्ज केस प्रकरणात हे आरोपपत्र एनसीबीने दाखल केलं आहे. त्यामुळे भारती आणि हर्ष लिंबाचियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२० साली ड्रग्ज केस प्रकरणात भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकही झाली होती. परंतु, आता एनसीबीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. २१ नोव्हेंबर २०२० रोजी एनसीबीने भारती आणि हर्ष यांच्या अंधेरीतील प्रोडक्शन ऑफिसमध्ये छापेमारी केली होती. या छापेमारीत ८६.५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. हर्ष आणि भारतीने ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली तपासात दिली होती. या प्रकरणात अटक झाल्यानंतर भारती आणि हर्षची १५ हजार रुपये जामिनावर सुटका करण्यात आली होती.

हेही वाचा >> आलिया भट्ट नोव्हेंबर महिन्यातील ‘या’ दिवशी देऊ शकते बाळाला जन्म, जाणून घ्या तारीख व वार

हेही वाचा >> Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा किसिंग सीन व्हायरल, ‘प्रेम प्रथा धुमशान’मधील बोल्ड अंदाज चर्चेत

भारती आणि हर्ष हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडीपैकी एक आहेत. त्यांनी छोट्या पडद्यावरील अनेक शो एकत्र होस्ट केले आहेत. काही महिन्यांपूर्वीच भारतीने त्यांच्या बाळाला जन्म दिला. त्यांच्या बाळाचे नाव लक्ष असं आहे. भारती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अनेकदा बाळाबरोबरचे मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत असते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncb filed chargesheet against comedy queen bharti singh and harsh limbachiyaa in drug case kak
First published on: 29-10-2022 at 12:05 IST