सोशल मीडियामुळे प्रेक्षक चित्रपट, मालिका, वेब सीरिज यांविषयी प्रेक्षक खुलेपणाने आपले मत मांडू लागले आहेत. एखाद्या चित्रपट किंवा मालिकेविषयी त्यांना काय वाटते, याबद्दल प्रेक्षक सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. आता लाखात एक आमचा दादा या मालिकेचा प्रोमो झी मराठीने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे.
‘झी मराठी वाहिनी’ने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर लाखात एक आमचा दादा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दाखविल्याप्रमाणे तुळजा आणि सत्यजितचे लग्न आहे. मात्र, तुळजाला तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थबरोबर लग्न करायचे असल्याने ती सूर्याच्या मदतीने घरातून पळून जाते. ती वेळेत मंडपात पोहोचत नसल्याने लोकांमध्ये कुजबुज सुरू होते. त्यावेळी डॅडी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळी ज्याच्याबरोबर तुळजाचे लग्न ठरलेले असते, तो सत्यजित एक व्हिडीओ दाखवीत तुळजा सूर्याबरोबर पळून गेल्याचे सर्वांना सांगतो. सूर्या आणि तुळजा परत येतात. तेव्हा सूर्याला मोठ्या प्रमाणात मारले जाते. त्यानंतर जबरदस्तीने सूर्या आणि तुळजाचे लग्न लावून दिले जाते. प्रोमोच्या शेवटी डॅडींनी तिच्या नावाची अंघोळ करून तुळजाच्या फोटोला हार घातलेला पाहायला मिळतो.
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आपले मत मांडले आहे.
काय म्हणाले नेटकरी?
लाखात एक आमचा दादा या मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “इतकी जबरदस्त स्टारकास्ट; पण कथानक एवढं कमकुवत?” तर दुसऱ्या नेटकऱ्याने, “काय सीन्स दाखवतात; जरा तरी स्टॅण्डर्ड जपा”, असे म्हटले आहे. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “कृपया असे सीन दाखवू नका.” आणखी एक नेटकरी कमेंट करीत म्हणतो, “मालिका कोणतीही असू दे; गोष्ट तीच राहणार आहे.” अनेक नेटकऱ्यांनी सूर्या आणि तुळजाचे लग्न झाले म्हणून आनंद व्यक्त केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, तुळजाचे लग्न डॅडींनी सत्यजितशी ठरवलेले असते. मात्र, डॉक्टर असलेल्या तुळजाला अशिक्षित सत्यजितबरोबर लग्न न करता, तिच्या बॉयफ्रेंड सिद्धार्थबरोबर लग्न करायचे असते. या सगळ्यात तिला सूर्या मदत करतो; मात्र आता प्रोमोमध्ये तुळजाचे सूर्याबरोबर लग्न झाले आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार, सूर्या आणि तुळजा यांच्यातील मैत्रीचे नाते तसेच राहणार का? त्यांच्यात काय समीकरणे असणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.