scorecardresearch

“फाफडा लाटण्याने कोण लाटतं?” अरुणाच्या डिशमुळे ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ ट्रोल, नेटकरी म्हणाले “रणवीर ब्रार…”

‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ला पुन्हा नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

masterchef india troll
'मास्टरशेफ ऑफ इंडिया'ला पुन्हा नेटकऱ्यांनी केलं ट्रोल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो आहे. या शोचा सध्या सातवा सीझन सुरू आहे. पहिल्या सीझनपासूनच मास्टरशेफ शोला लोकांची पसंती मिळाली. यंदाचा सीझनही अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. मास्टरशेफ ऑफ इंडियाचा सातवा सीझन अंतिम टप्प्यात आला आहे.

‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ शोच्या सातव्या सीझनचा फिनाले वीक सुरू आहे. यंदाच्या पर्वाची ट्रॉफी व गोल्डन कोट नावावर करण्यासाठी टॉप ६ स्पर्धकांमध्ये चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या मास्टरशेफ ऑफ इंडिया शोच्या फिनाले वीकच्या भागामुळे पुन्हा एकदा हा शो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

मास्टरशेफच्या फिनाले वीकमध्ये अरुणाने बनवलेल्या डिशमुळे प्रेक्षक नाराज आहेत. अरुणाने फिनाले वीकच्या पहिल्या टास्कमध्ये पापडी चाटमध्ये इनोव्हेशन करुन पदार्थ बनवला होता. परंतु, तिच्या पदार्थाच्या सादरीकरणामुळे नेटकऱ्यांनी मास्टरशेफला ट्रोल केलं आहे. “हा अरुणाचा फायनल वीकमधील पदार्थ आहे. रणवीर ब्रार आणि इतर प्रेक्षक अरुणाला फायनलमध्ये आणल्याने लाजिरवाणं वाटत असेल”, असं एकाने ट्वीट करत म्हटलं आहे.

हेही वाचा>> एमसी स्टॅन व अब्दु रोझिकमधील वादावर शिव ठाकरेची प्रतिक्रिया, म्हणाला “त्यांच्यामध्ये…”

हेही वाचा>> लेकाला धमकीचा मेल आल्यानंतर सलीम खान चिंतेत, सलमान खानच्या मित्राचा खुलासा, म्हणाला “ते रात्रभर…”

“मास्टरशेफ ऑफ इंडियाच्या परीक्षकांनी पदार्थाच्या सादरीकरणाबद्दल पहिल्या दिवसापासून स्पर्धकांना मार्गदर्शन केलं. अरुणाने फिनाले वीकमध्ये सादर केलेली ही डिश. इतर स्पर्धक वेगळे फ्लेवर्स तपासून पाहत असताना अरुणाने दोन चिप्स तळून प्लेटमध्ये ठेवले. निराशाजनक फिनाले”

“अरे ती चटनी इथे तिथे पडत आहे” असं म्हणत एकाने अरुणाच्या डिशची खिल्ली उडवली आहे.

“मठरीला एक-दोन वेगळ्या फ्लेवर्सच्या चटणींबरोबर ठेवा…”

मास्टरशेफ शो अरुणासाठी पक्षपात करतो. खांडवी अशी बनवतात का? फाफडा लाटण्याने कोण बनवतं? प्रत्येक गुजराती अरुणावर हसत असेल..

कमलदीप कौर, शांता शर्मा, नयनज्योती, गुरकीरत सिंग, सुवर्णा बागुल आणि अरुणा विजय हे मास्टरशेफ ऑफ इंडियाच्या सातव्या पर्वाचे टॉप ६ स्पर्धक आहेत. यंदाच्या पर्वाचा विजेता कोण होणार, हे पाणं रंजक असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 17:31 IST

संबंधित बातम्या