सध्या टेलिव्हिजन विश्वामध्ये ‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या पर्वाची चर्चा आहे. काही आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून सलमान खानने या प्रसिद्ध शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम केले आहे. आता बिग बॉस आणि सलमान खान हे समीकरण तयार झाले आहे. परंतु सलमानला डेंग्यू झाल्यामुळे सलमानच्या जागी करण जोहर हा शो होस्ट करताना दिसतोय. गेले दोन भाग करणने या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. पण करणच्या सूत्रसंचालनावर प्रेक्षक प्रचंड टीका करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : न्यूयॉर्कमधील सरकारी शाळांना दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याचे कळताच प्रियांका चोप्राला बालपणीची आठवण; म्हणाली..

करण जोहरचे सूत्रसंचालन हे प्रेक्षकांना अजिबात आवडलेले नाही. नेटकऱ्यांनी करण जोहरवर ‘बिग बॉस’मध्ये भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. तसेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर सलमानला या शोमध्ये परत आणण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

एका नेटकऱ्याने करणवर टीका करत लिहिले, “गौरी आणि अर्चना या दोघीही बोलताना तितकीच अर्वाच्च भाषा वापरतात. करण जोहरने पूर्ण एपिसोड पाहावा. चूक त्या दोघांचीही होती.” आणखी एका नेटकऱ्याने ट्विट करून लिहिले, “कोणी सहमत असो वा नसो, मला पर्वा नाही, पण करण जोहर पक्षपाती आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “करण जोहरने ‘वीकेंड का वार’मध्ये खूप भेदभाव केला आहे आणि हे टीव्हीवर स्पष्टपणे दिसत आहे!! तो काही स्पर्धकांच्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करतो आणि इतर स्पर्धकांना बोलू देत नाही.”

हेही वाचा : “बिग बी कसे आणि तुम्ही…”, जया बच्चन यांच्यावर नेटकरी नाराज, जाणून घ्या नेमकं काय घडलं

त्यामुळे सलमान खान कधी या शोमध्ये परततो याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘बिग बॉस 16’मध्ये साजिद खान, अब्दू रोजिक, टीना दत्ता, एमसी स्टेन, आहाना गौतम, शालिन भानोत, सौंदर्या शर्मा, अंकित गुप्ता, प्रियंका चहर चौधरी, निम्रित कुर अहलुवालिया, अंकित गुप्ता, गौतम सिंग विग, शिव ठाकरे, सुंबूल तौकीर सिंग खान, रिअॅलिटी शो आणि गौरी नागोरी हे स्पर्धक बिग बॉसच्या घरात टिकाव धरून आहेत. रोजच या घरात काही ना काही घडताना दिसत आहे. त्यामुळे आता पूढे यात कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens trolled karan johar for being biased host rnv
First published on: 24-10-2022 at 13:26 IST