‘सातव्या मुलीची सातवी मुलगी'(Satvya Mulichi Satvi Mulgi) या मालिकेत सतत काही ना काही घडताना दिसते. आता या मालिकेत पुन्हा एकदा नवीन वळण येणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.’झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.

नेत्राने केलेली युक्ती यशस्वी ठरणार

झी मराठी वाहिनीने ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की नेत्रा केदारला म्हणते, “तुम्हाला जे काम दिलंय ते आज रात्री व्हायला हवं”, यावर केदार म्हणतो, “बघतो”, त्याचे हे शब्द ऐकून नेत्रा म्हणते, “मग तो व्हिडीओ…”, नेत्राने असे म्हणताच केदार करतो असे म्हणतो. त्यानंतर केदार सगळ्यांना एकत्र बोलवतो आणि म्हणतो, यापुढे सगळ्यांनी दादाशी चांगलं बोलायचं. त्याची पत्नी केतकी म्हणते, “तू हे सगळं कोणाच्या दबावाखाली बोलत नाहीयेस ना?” तिच्या या प्रश्नावर केदार बसलेला दिसत आहे. याबरोबरच, केदार अचानक सगळ्यांना शेखरशी चांगले बोलायला का सांगत आहे, असा प्रश्नही घरातील सर्वांना पडल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.

Navri Mile Hitlarla
“सगळा प्रश्न तुमच्या मतावर…”, लीलाला सासरी पुन्हा स्थान मिळणार का? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार मोठा ट्विस्ट
This advice was given to Nivedita saraf by Ashok Saraf for the serial Aai Aani Baba Retire Hot Aahet
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ मालिकेसाठी अशोक…
Leena Bhagwat Reaction on Husband Mangesh kadam serial Aai Aani Baba Retire Hot Aahet
“तुमच्यामधील केमिस्ट्री…”, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ मालिकेबद्दल लीना भागवत यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
suyash tilak and suruchi adarkar
“त्यावेळी मी सुरुचीशी खूप…”, सुयश टिळकने सांगितली ‘का रे दुरावा’ मालिकेदरम्यानची आठवण; म्हणाला, “मी थेट…”
Bigg Boss 18 Karan Veer Mehra Opens Up About His Ex Wives watch new promo
Bigg Boss 18: करणवीर मेहराने पूर्वाश्रमीच्या दोन पत्नीविषयी केलं भाष्य, भावुक होत म्हणाला, “दोघींच्या आयुष्यात मी…”
Bigg Boss 18 avinash Mishra rajat dalal and Digvijay rathee physical fight for isha singh watch promo
Bigg Boss 18 मध्ये पुन्हा शारिरीक हिंसा, अविनाश मिश्रा-रजत दलाल दिग्विजय राठीच्या अंगावर धावून गेले अन्…; नेमकं काय घडलं?
Tharala Tar Mag Fame Jyoti Chandekar fainted on set
सेटवर बेशुद्ध झाले, २ महिने मालिकेतून ब्रेक अन्…; ‘ठरलं तर मग’च्या पूर्णा आजीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, लेखिका म्हणाल्या…
Sashshank Ketkar
“म्हणून हा चॉकलेट केक…”, शशांक केतकरच्या मुलाचे बोबडे बोल ऐकलेत का? असा साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस
Amruta Deshmukh
अभिनेत्री अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकणार; ‘या’ कलाकारांबरोबर शेअर केला फोटो

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “केदारचं शेखरशी वागणं बदलणार…”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, मेघना अद्वैतच्या आयुष्यात त्याची सेक्रेटरी म्हणून प्रवेश करते. सतत त्याच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करते. बंटी, ज्याला शतग्रीव म्हणूनही ओळखले जाते, त्याने ठरवले की तो आता शाळेत जाणार नाही . शेखरच्या परत आल्याने नेत्राला खूप आनंद होतो. घरी आल्यावर केदार शेखरला धमकावतो आणि काही महत्त्वाची माहिती त्याच्याकडून काढून घेतो. पण नेत्रा आधीच केदारच्या कृत्यांचे व्हिडिओ क्लिप्स रेकॉर्ड करून ठेवते. नेत्रा ते व्हिडीओ केदारला दाखवते आणि त्याला इशारा देते की तो व्हिडीओ ती संपूर्ण कुटुंबाला दाखवेल ज्यामुळे केदारचे सत्य समोर येईल. नेत्राच्या या धमकीमुळे केदारला आपल्या केलेल्या गोष्टी सुधारण्यास भाग पाडलं जातं. नेत्रा त्या व्हिडिओ क्लिप्सचा वापर करून सर्व काही ठीक करण्याचा प्रयत्न करते, आणि शेवटी तिच्या धाडसामुळे परिस्थिती हळूहळू सुधारू लागल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: पहिल्या सिनेमानंतर ‘या’ अभिनेत्रीकडे नव्हतं दोन वर्षं काम, वडापाववर काढले दिवस; लोकल ट्रेनने केला प्रवास, खुलासा करत म्हणाली…

दरम्यान, आता केदार यापुढे काय पाऊल उचलणार, मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असते.

Story img Loader