Star Pravah New Marathi serial : 'विठुमाऊली' व 'दख्खनचा राजा जोतिबा' या मालिकांच्या यशानंतर 'स्टार प्रवाह' वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला आता लवकरच एक नवीन पौराणिक मालिका घेऊन येणार आहे. सध्या वाहिन्यांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत सातत्य राखण्यासाठी चढाओढ सुरू आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन आशयाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. 'घरोघरी मातीच्या चुली', 'येड लागलं प्रेमाचं', 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या मालिकांनंतर आता 'स्टार प्रवाह'वर आणखी एक नवीन मालिका लॉन्च करण्यात येणार आहे. याबद्दल जाणून घेऊयात… स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही दिवसांत ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ ही नवीन ( New Marathi Serial ) पौराणिक मालिका प्रदर्शित केली जाणार आहे. आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी श्रद्धास्थानं आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीची कुलदेवता म्हणून पूजा केली जाते. ही आदिशक्ती आईप्रमाणे आपल्या कुटुंबाचं, भक्तांचं रक्षण करते. आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न 'उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची' या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे. हेही वाचा : Happy Birthday बायको! रितेशने जिनिलीयाला दिल्या हटके शुभेच्छा, रोमँटिक नव्हे तर शेअर केला मजेशीर व्हिडीओ सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची 'कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड' ही निर्मिती संस्था या भव्य मालिकेची निर्मिती करणार आहे. निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते 'उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची' या मालिकेचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. महेश कोठारे नव्या मालिकेबद्दल काय म्हणाले? नव्या मालिकेबद्दल ( New Marathi Serial ) महेश कोठारे म्हणाले, "स्टार प्रवाह वाहिनीबरोबर खूप जुने ऋणानुबंध आहेत. 'मन उधाण वाऱ्याचे' ही पहिली मालिका यांच्याबरोबर केली होती. त्यानंतर 'विठुमाऊली', 'दख्खनचा राजा जोतिबा', 'पिंकीचा विजय असो', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' अशा सुपरहिट मालिका केल्या. आता 'उदे गं अबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची' या महामालिकेतून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा उलगडण्यात येणार आहे." हेही वाचा : नवरा माझा नवसाचा २ : सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित! सचिन पिळगांवकर म्हणाले, “गणपतीपुळ्याचे प्रवासी कन्फर्म…” स्टार प्रवाहवर सुरू होणार नवीन मालिका ( New Marathi Serial ) "आमची ही नवीन मालिका भव्यदिव्य असेल यात शंका नाही. या भव्यदिव्य मालिकेतून कोणकोणते कलाकार भेटीला येणार? सेट कसा असेल? याविषयी प्रेक्षकांना लवकरच कळेल. या नव्या प्रोजेक्टसाठी प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळावेत हीच इच्छा व्यक्त करेन. नक्की पाहा 'उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची' लवकरच फक्त स्टार प्रवाहवर" असं आवाहन महेश कोठारे यांनी प्रेक्षकांना केलं आहे.