संजय लीला भन्साळी यांची ‘हीरामंडी- द डायमंड बझार’ ही वेब सीरिज रीलिज झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, शर्मिन सेगल, मनीषा कोईराला, रिचा चड्ढा, संजीदा शेख अशी तगडी स्टारकास्ट या वेब सीरिजला लाभल्यामुळे या अभिनेत्रींचं खूप कौतुक झालं. परंतु, या सगळ्यात संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सेगलला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

‘हीरामंडी’मध्ये आलमजेबची भूमिका साकारणारी शर्मिन सेगल गेल्या काही दिवसांपासून ट्रोल होतेय. या वेब सीरिजमध्ये तिने अभिव्यक्तीहीन अभिनय केला आहे, असं ट्रोलर्सचं म्हणणं आहे. अनेकांनी तर तिच्यावर मीम्स केले आहेत. तर काहीजणांनी तिच्या अभिनयावर नक्कल करणाऱ्या रिल्स सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत आणि त्या मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होत आहेत. अशातच आता काही अभिनेत्रींनी मिळून तिची नक्कल केली आहे आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा… “आपला लक्ष्या गेला रे…”, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाबद्दल महेश कोठारे झाले व्यक्त, म्हणाले…

निया शर्मा, रीम शेख, जन्नत झुबेर यांनी शर्मिन ऊर्फ आलमजेबची खिल्ली उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या शोच्या सेटवर तिघींनी हा व्हिडीओ शूट केलाय, ज्यात त्यांनी आलमजेबच्या “एक बार देख लिजिए दिवाना बना दिजिए…” या डायलॉगची नक्कल केली आहे. पण, यात त्यांनी अगदी निर्विकार (Expressionless) अभिनय केला आहे.

निया शर्माने हा व्हिडीओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच ठिकाणी हा व्हिडीओ व्हायरल झाला. अनेकांनी तिघींच्या अभिनयाची दाद दिली आणि कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंट करत मुद्दाम लिहिलं, “हे खूप अनादरकारक आहे, असं पुन्हा करा” तर दुसऱ्याने लिहिलं, “शर्मिनपेक्षा यांचे हावभाव जास्त दिसतायत.” अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करत या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा… ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम साईराज केंद्रेचा ‘पुष्पा-२’च्या गाण्यावर हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल

तर काही जणांनी निया, रीम आणि जन्नतलाच ट्रोल केलं. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “या अभिनेत्री त्यांच्याच इंडस्ट्रीमधील अभिनेत्रीची खिल्ली उडवतात हे खूप खेदजनक आहे.” तर एक जण कमेंट करत म्हणाला, “अभिनेत्री असूनदेखील तुम्ही दुसऱ्या अभिनेत्रीचा असा अनादर कसा करू शकता, तुमच्याबद्दल जो माझ्या मनात आदर होता तो मी आजपासून गमावला.”