Bigg Boss Marathi Fame Nikki And Arbaz : ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनमध्ये मैत्री, वाद, प्रेम हा सगळा ड्रामा एकत्रितपणे प्रेक्षकांना पाहायला मिळतो. ‘बिग बॉस’च्या घरात जुळलेल्या जोड्या शोपुरत्या मर्यादित राहतात त्यानंतर बाहेर आल्यावर या सदस्यांची नाती टिकत नाहीत असं वारंवार बोललं जातं. अर्थात, प्रिन्स-युविकासारखी काही जोडपी याला अपवाद ठरली आहेत. पण, बहुतांशवेळा रिअ‍ॅलिटी शोमधलं रिलेशनशिप खऱ्या आयुष्यात फारसं ‘रिअल’ नसल्याचं पाहायला मिळतं. अगदी यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या सीझनमध्ये सहभागी झालेल्या निक्की-अरबाजच्या नात्याबद्दल सुद्धा असंच काहीसं बोललं गेलं होतं.

निक्की-अरबाज ( Nikki And Arbaz ) एकमेकांबरोबर फक्त शोसाठी आहेत. त्यांचं नातं केवळ टीव्हीवर सर्वांना दाखवण्यासाठी आहे, हा त्यांचा प्लॅन आहे असं शो सुरू असताना वारंवार बोललं जायचं. याशिवाय अरबाजच्या आधीच्या रिलेशनशिपमुळे निक्कीच्या आईने देखील सुरुवातीला त्यांच्या नात्याला विरोध दर्शवला होता. त्यामुळे शो संपल्यावर निक्की-अरबाज वेगळे होणार असा अंदाज अनेकांनी बांधला होता. पण, प्रत्यक्षात मात्र असं काहीच झालेलं नाही. दोघांनी ‘बिग बॉस’च्या घरात एकमेकांना शब्द दिल्याप्रमाणे हे दोघंही हा शो संपल्यावर सुद्धा एकत्र आहेत. या दोघांनी त्यांचं रिलेशनशिप उघडपणे मान्य केलं नसलं तरीही “माझ्या आयुष्यात अरबाज खूप खास आहे, आमच्यात खूप चांगला बॉण्ड आहे” असं निक्कीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
padsaad reders reactions
पडसाद: अबू यांची चित्रशैली उलगडली
Bigg Boss 18 Farah Khan warns to rajat dalal on weekend ka vaar
Bigg Boss 18: “…तर तू थेट शो बाहेर होशील”, फराह खानने रजत दलालला चांगलंच झापलं अन् दिली शेवटची ताकीद, म्हणाली, “तू स्वतःला…”
Bigg Boss 18 Shalini Passi entry in salman khan show
Bigg Boss 18: सलमान खानच्या शोची टीआरपीसाठी धडपड, २६९० कोटींची मालकीण शालिनी पासीची घरात एन्ट्री
Bigg Boss 18 Karanveer Mehra Recall Sushant Singh Rajput memories
Bigg Boss 18मधील ‘या’ सदस्याला दारू सोडण्यासाठी सुशांत सिंह राजपूतने केली होती मदत, म्हणाला, “त्याने मला एक डायरी दाखवली…”
Salman Khan Meet Zeeshan Siddique
सलमान खान झिशान सिद्दिकींबरोबर दुबईला रवाना; फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Bigg Boss 18 avinash Mishra rajat dalal and Digvijay rathee physical fight for isha singh watch promo
Bigg Boss 18 मध्ये पुन्हा शारिरीक हिंसा, अविनाश मिश्रा-रजत दलाल दिग्विजय राठीच्या अंगावर धावून गेले अन्…; नेमकं काय घडलं?

हेही वाचा : Video : ‘कलर्स मराठी’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत मुक्ता बर्वेची एन्ट्री! जबरदस्त लूक अन् प्रोमोने वेधलं लक्ष

निक्की-अरबाजची एकत्र ट्रिप

आता शो संपल्यावर हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र ट्रिपवर गेले आहेत. मंगळवारी पापाराझींनी एअरपोर्टवर निक्की-अरबाजला एकत्र पाहिलं. यावेळी दोघांनी कॅमेऱ्यासमोर एकत्र पोझ दिल्या. सुरुवातीला दोघंही औरंगाबादला निघाल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्यानंतर काही वेळातच निक्कीने चंदीगढ लोकेशन मार्क करून इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. त्याच्या पुढच्या स्टोरीमध्ये दोघंही गाडीतून एकत्र प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर रात्री उशिरा या दोघांनी मनाली हिमाचल प्रदेश असं लोकेशन शेअर करत स्टोरी शेअर केली. तसेच या स्टोरीमध्ये हिटर देखील पाहायला मिळत आहे. यामुळे निक्की-अरबाज ( Nikki And Arbaz ) शो संपल्यावर एकत्र फिरायला गेल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने सुरू केला नवीन व्यवसाय! अनोख्या बिझनेसचं सर्वत्र होतंय कौतुक

Bigg Boss Marathi Fame Nikki And Arbaz :
निक्की-अरबाज इन्स्टाग्राम स्टोरी ( Bigg Boss Marathi Fame Nikki And Arbaz )

दरम्यान, निक्की-अरबाज एकत्र ट्रिपला गेल्याने सध्या या दोघांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याशिवाय दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, शो संपल्यावर आता हे दोघंही आपआपल्या कामात व्यग्र झाले आहेत. याकाळात अरबाजचा एक म्युझिकल व्हिडीओ देखील प्रदर्शित झाला आहे.

Story img Loader