Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचे पर्व रविवारी (६ ऑक्टोबर रोजी) संपले तरी सगळीकडे याच शोची चर्चा आहे. बारामतीजवळच्या मोढवे गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील रीलस्टार सूरज चव्हाण या शोचा विजेता ठरला. तर अभिजीत सावंत बिग बॉस मराठीचा उपविजेता ठरला. शोचा हा सीझन जिच्यामुळे सर्वाधिक गाजला ती निक्की तांबोळी तिसऱ्या क्रमांकावर राहिली. सूरज विजेता झाला, त्याबद्दल निक्कीने आता पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

निक्की तांबोळी व स्पर्धक अरबाज पटेल या शोमध्ये जवळ आले, दोघे प्रेमात पडले आणि त्यांच्या प्रेमाची खूप चर्चा झाली. निक्की व अरबाज शोनंतरही एकत्र दिसत आहेत. ते नुकतेच डेटवर गेले होते, तेव्हाचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिथेच निक्कीला सूरजने ट्रॉफी जिंकली, त्याबद्दल विचारण्यात आलं. निक्कीने बिग बॉस मराठीचा विजेता सूरजबद्दल काय म्हटलं, ते जाणून घेऊयात.

What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : भाऊबीजेला अजित पवारांची वाट बघणार का? सुप्रिया सुळेंचं उत्तर, “प्रेम असतं तेव्हा…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Sujay Vikhe Patil Emotional Speeh
Sujay Vikhe Patil : भरसभेत सुजय विखेंना अश्रू अनावर; म्हणाले, “सातत्याने मला संपवण्याचा प्रयत्न होतोय!”
Nirav Modi Letter of Understanding bank Business |
हिरा है सदा के लिये! – उत्तरार्ध
Ashok Chavan daughter, Tirupati Kadam, Bhokar,
भोकरममध्ये अशोक चव्हाणांच्या कन्येला तिरुपती कदमांचे आव्हान
Mayuresh Wanjale
खडकवासला मतदारसंघातील समीकरणे बदलणार ?
Sreejaya Ashok Chavan News
Sreejaya Chavan श्रीजया चव्हाण भाजपाकडून लढवणार निवडणूक, वडील अशोक चव्हाण म्हणाले, “आता तिला…”
“…अन् सुनिधी चौहान मला म्हणाली, ‘माझ्या जवळ येऊ नकोस…'”, विजय वर्माने सांगितला ‘तो’ अनुभव

हेही वाचा – Bigg Boss संपल्यावर निक्की-अरबाज एकत्र! शेअर केला पहिला सेल्फी; फोटो अन् कॅप्शन पाहून नेटकरी म्हणाले, “बाई…”

निक्कीने सूरजबद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिलं उत्तर

सूरज विजेता होण्यास पात्र होता का? असा प्रश्न निक्की तांबोळी विचारण्यात आला. निक्कीने सूरज डिझर्व्हिंग होता, तो ट्रॉफी जिंकल्याचा आनंद आहे, असं मत व्यक्त केलं. “हो सूरज विजेता होण्यासाठी खूप जास्त पात्र होता. पहिल्या दिवसापासून पाहायचं झाल्यास सूरज सर्वात वेगळा होता. आम्ही सगळेही स्वतंत्र खेळत होतो, मात्र सूरज हा सर्वांपेक्षा वेगळा होता. तो खरंच पात्र होता आणि आम्हाला वाटत होतं की तो जिंकेल. मी त्याच्यासाठी खूप खूश आहे. मी त्याला राखी बांधली आहे. तो ट्रॉफीचा खरा हकदार आहे,” असं निक्की म्हणाली.

हेही वाचा – सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi जिंकल्यावर अंकिता वालावलकरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मिळालेलं…”

बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व ब्लॉकबस्टर ठरले. या शोला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडीत निघाले. रितेश देशमुखने पहिल्यांदाच होस्ट केलेल्या या शोची प्रेक्षकांमध्येही खूप क्रेझ आहे. ७० दिवसांच्या प्रवासानंतर सूरज चव्हाण प्रेक्षकांची मनं जिंकून मतं मिळवून ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला. सूरज आता त्याच्या गावी ट्रॉफी घेऊन गेला आहे. गावी त्याचं खूप जल्लोषात स्वागत करण्यात आलं.